कणकवली : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे ग्रामनियंत्रण समिती व कासार्डे सिलिका असोसिएशनच्या सौजन्याने रुक्मिणी मंगल कार्यालय येथे वीस खाटांच्या ग्राम विलगीकरण कक्षाचा शुभारंभ कणकवलीचे सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला.कासार्डेत विलगीकरण कक्ष सुरू केल्यामुळे त्याचा या परिसरातील रुग्णांना फायदा होणार आहे. यावेळी उपसभापती प्रकाश पारकर, सरपंच बाळाराम तानवडे, उपसरपंच बाबूभाई पेडणेकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, तलाठी किरण गावडे, पोलीसपाटील महेंद्र देवरुखकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सिध्दी पालांडे, आरोग्यसेवक संजय सावंत, कोतवाल दीपक आरेकर, माजी उपसरपंच पूजा जाधव, प्रसाद जाधव, संजय नकाशे, संजय पाताडे, दीपक पाताडे, मिलिंद पाताडे, नामदेव बांदिवडेकर, राजीव पाताडे, दीपक सावंत, विद्याधर नकाशे, नंदू कोकाटे, जयेश पाटील, दीपक सावंत, विजय राणे, आदी मान्यवर उपस्थित होते.कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे ग्रामस्तरावर विलगीकरण कक्षाची सोय केल्याने गावातील रूग्णांना याचा फायदा होणार असून, यामुळे स्थानिक पातळीवर उपचार मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. प्रथमदर्शनी वीस खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, त्याचबरोबर इतर सुविधा पुरविण्यात येणार आहेत. या विलगीकरण कक्षासाठी कासार्डे ग्रामनियंत्रण समिती, कासार्डे सिलिका असोसिएशन व कराळे यांचे सहकार्य मिळाले आहे.
कासार्डेत ग्राम विलगीकरण कक्षाचा सभापतींच्या हस्ते प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 18:19 IST
CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथे ग्रामनियंत्रण समिती व कासार्डे सिलिका असोसिएशनच्या सौजन्याने रुक्मिणी मंगल कार्यालय येथे वीस खाटांच्या ग्राम विलगीकरण कक्षाचा शुभारंभ कणकवलीचे सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला.
कासार्डेत ग्राम विलगीकरण कक्षाचा सभापतींच्या हस्ते प्रारंभ
ठळक मुद्देकासार्डेत ग्राम विलगीकरण कक्षाचा सभापतींच्या हस्ते प्रारंभ ग्रामनियंत्रण समिती व कासार्डे सिलिका असोसिएशनच्या सौजन्याने केला कक्ष