शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीत राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 12:30 IST

Ncp, Vaibhawadi, Sindhudurgnews जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कुणीही कमी लेखण्याची चूक करू नये. जिल्ह्यात आमची ताकद वाढत असून येत्या निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपासह गरज भासल्यास मित्रपक्षांनाही पक्षाची ताकद दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे दिला.

ठळक मुद्देवैभववाडीत राष्ट्रवादीच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटनविरोधक, मित्रपक्षांनाही राष्ट्रवादीची ताकद निवडणुकीत दाखवून देऊ : अमित सामंत

वैभववाडी : जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कुणीही कमी लेखण्याची चूक करू नये. जिल्ह्यात आमची ताकद वाढत असून येत्या निवडणुकीत विरोधी पक्ष भाजपासह गरज भासल्यास मित्रपक्षांनाही पक्षाची ताकद दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी येथे दिला.तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी काका कुडाळकर, विधानसभाप्रमुख अनंत पिळणकर, अशोक पवार, समीर आचरेकर, रुपेश जाधव, डॉ. अभिनंदन मालंडकर, भास्कर परब, रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.सामंत म्हणाले, गेले वर्ष-दीड वर्ष जिल्ह्यात आम्ही संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. पक्षाचे अनेक पदाधिकारी ते काम प्रामाणिकपणे करीत आहेत. त्याचा चांगला परिणाम आता दिसून येत आहे. जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीत आमचा पक्ष ताकदीने उतरणार आहे.आमचा पहिला शत्रू भाजप असून त्या पक्षाविरोधात आम्ही ताकदीने काम करणार आहोत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविली जावी असा आमचा आग्रह असणार आहे. परंतु पक्षाला सन्मानाचा वाटा मिळणे आवश्यक आहे.

जर मित्रपक्षांनी सन्मान राखला नाही तर मात्र आमचा मार्ग आमच्यासाठी मोकळा असणार आहे. दरम्यान, भविष्यात गाव तिथे राष्ट्रवादी अशी संकल्पना राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक बूथवर किमान पाच तरी कार्यकर्ते तयार करण्याचे काम केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.निवडणूक विकासाच्या मुद्यावर लढविणारवाभवे वैभववाडी नगरपंचायतीत काम करणाऱ्या कारभाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे. शहराचा अपेक्षित विकास झाला नाही. नगरपंचायतीचा वापर निव्वळ स्वत:च्या राजकारणासाठी काहींनी केला. शहरातील जनतेचा पाण्यासारखा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्यावरच लढविणार असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसsindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडी