शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

देवगड येथे सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 19:29 IST

tourism Sindhudurg- भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे उद्घाटन देवगड बीचवरती आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. फ्लाईंग कोकण यांच्यावतीने या झीपलाईनसाठी सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहे. यामुळे देवगडच्या पर्यटन विकासामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.

ठळक मुद्देदेवगड येथे सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे थाटात उद्घाटनपर्यटकांना सुविधा देण्यात येणार : पर्यटन विकासामध्ये मानाचा तुरा

देवगड : भारतीय समुद्रकिनाऱ्यावरील व महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीच्या झीपलाईनचे उद्घाटन देवगड बीचवरती आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. फ्लाईंग कोकण यांच्यावतीने या झीपलाईनसाठी सुविधा नागरिकांना देण्यात येणार आहे. यामुळे देवगडच्या पर्यटन विकासामध्ये आणखी एक मानाचा तुरा खोवण्यात आला आहे.देवगड पवनचक्की ते बीचवरून देवगड किल्ला रोडकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत १८८५ फूट लांब व २८० फूट उंचीवरून जाणाऱ्या या झीपलाईनची सुविधा फ्लाईंग कोकण यांच्यावतीने सुरू करण्यात आली आहे. या झीपलाईनचे उद्घाटन आमदार नीतेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नगराध्यक्षा प्रियांका साळसकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र वालकर, देवगड पंचायत समिती सभापती सुनील पारकर, कणकवली सभापती दिलीप तळेकर, बाळा खडपे, प्रकाश राणे, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, संदीप साटम, नगरसेवक उमेश कणेरकर, माजी नगरसेवक शरद टुकरुल, उष:कला केळुस्कर, नगरसेवक बापू जुवाटकर, विकास कोयंडे, उज्ज्वला अदम, प्राजक्ता घाडी, सुभाष धुरी, योगेश चांदोस्कर, माजी नगरसेवक गणपत गावकर व फ्लाईंग कोकणचे जोईल बंधू, आदी उपस्थित होते.पर्यटन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न : नीतेश राणेया झीपलाईनच्या उद्घाटनप्रसंगी आमदार नीतेश राणे म्हणाले, पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून देवगड तालुक्याचा विकास केला जात आहे. भविष्यामध्ये मालवणपेक्षाही देवगड तालुक्यामध्ये जास्त पर्यटकांचा लोंढा येऊन पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. पर्यटनाचे प्रकल्प जास्तीत जास्त आणण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. जनतेमधूनही असे पर्यटनात्मक प्रकल्प उभारणाऱ्या व्यक्तींना आपले कायम सहकार्य राहणार आहे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :tourismपर्यटनDevgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे