कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे उदघाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 10:48 AM2020-02-11T10:48:53+5:302020-02-11T13:05:53+5:30

सिंधुदुर्गवासीयांच्या सुदृढ आरोग्यासाठी आम्ही दक्ष असून आरोग्य विषयक इतर सुविधाही उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.

 Inauguration of Dialysis Center at Kankavali Upazila Hospital | कणकवली उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे उदघाटन

कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात किडनी डायलिसिस यंत्रणा लोकार्पण सोहळ्याच्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी मनोगत व्यक्त केले

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचे उदघाटनसिंधुदुर्गवासीयांच्या सुदृढ आरोग्यासाठी आम्ही दक्ष : उदय सामंत

कणकवली :आरोग्याच्या दृष्टीने किडनी डायलिसिस यंत्रणा महत्वाची आहे. या सुविधेचा कमीतकमी वापर व्हावा एवढे सुदृढ आरोग्य सिंधुदुर्गवासीयांना मिळावे अशा सदिच्छा मी व्यक्त करतो. तसेच दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना मोफत तर इतर सर्वसामान्य रुग्णांना ३०० ऐवजी १५० रुपयांत सिंधुदुर्गातील शासकीय रुग्णालयात डायलिसिस सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल . सिंधुदुर्गवासीयांच्या सुदृढ आरोग्यासाठी आम्ही दक्ष असून आरोग्य विषयक इतर सुविधाही उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे केले.

सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबईच्यावतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आलेल्या किडनी डायलिसिस यंत्रणेचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हापरिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलीफे, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, तहसीलदार रमेश पवार, गटविकास अधिकारी मनोज भोसले, उपसभापती दिव्या पेडणेकर, नीलम पालव, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सुजित जाधव, हर्षद गावडे, संदेश पटेल, संजय आग्रे, नगरसेवक सुशांत नाईक, अबीद नाईक, रुपेश नार्वेकर , राजू शेट्ये , वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील, डॉ . सतीश टाक, डॉ. शिकलगार, मनोहर परब आदी उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आयसीयू युनिट लवकरच सुरू करण्यात येईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉक्टर ,तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी हे जनसेवेसाठी कायमच तत्पर असतात. त्यामुळे त्यांना जादा काम करावे लागले तरी ते करतील. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध असलेल्या स्टाफमध्येच आयसीयू युनिट सुरू करण्यात येईल. आपली जबाबदारी पुढे ढकलून रुग्णांना उपचारासाठी इतर ठिकाणी पाठवू नका.

दर्जेदार उपचार आणि सुविधा येथील जनतेला द्या

रेडी बंदरात आलेल्या जहाजावरील कर्मचारी, खलाशी यांना कोरोना व्हायरसची लागण झालेली नाही. त्यामुळे सिंधुदुर्गला कोणतीही भीती नसून विनाकारण पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. जिल्हा प्रशासन याबाबत दक्ष असून ज्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या जहाजावर जाऊन न घाबरता तपासणी केली. त्यांचे मी कौतुक करतो. अशा अधिकाऱ्यांची आपल्याला आवश्यकता आहे. असेही पालकमंत्री सामंत यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, आरोग्य समस्येने भारतातील जनता दारिद्र्य रेषेखाली गेली आहे. त्यातून तिला बाहेर काढणे आवश्यक आहे. डायलिसिस ही अत्यावश्यक सेवा असून
जिल्हा प्रशासन या सुविधेसाठी निधी उपलब्ध करून देईल.

डॉ. धनंजय चाकूरकर म्हणाले, सावंतवाडी, ओरोसनंतर आता कणकवलीत किडनी डायलिसिस यंत्रणा सुरू होत आहे. जिल्ह्यात १५ युनिटच्या माध्यमातून डायलिसिस सेवा मिळत आहे. कणकवलीत दर्जेदार डायलिसिस सेवा देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृपा गावडे यांनी केले.

 

Web Title:  Inauguration of Dialysis Center at Kankavali Upazila Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.