गप्पा मारता मारता तरूणी चक्कर येऊन तलावात पडली; २ युवक बनले देवदूत, सुखरूप बाहेर काढले

By अनंत खं.जाधव | Updated: March 22, 2025 22:24 IST2025-03-22T22:23:08+5:302025-03-22T22:24:21+5:30

सावंतवाडीतील घटना, मोती तलावात पडलेल्या युवतीसाठी दोघे तरूण बनले देवदूत, युवती सुखरूप 

In Sindhudurg, a girl fell into a pond after getting dizzy while chatting; 2 youth save her life | गप्पा मारता मारता तरूणी चक्कर येऊन तलावात पडली; २ युवक बनले देवदूत, सुखरूप बाहेर काढले

गप्पा मारता मारता तरूणी चक्कर येऊन तलावात पडली; २ युवक बनले देवदूत, सुखरूप बाहेर काढले

सावंतवाडी - सावंतवाडीतील मोती तलावाकाठी गप्पा मारत असलेल्या एका महाविद्यालयीन युवतीला अचानक चक्कर आल्याने ती चक्क तलावात कोसळली पण हा प्रसंग ज्यांनी बघितला त्यांनी लागलीच धावाधाव केल्याने ती महाविद्यालयीन युवती बुडता बुडता थोडक्यात वाचली त्या मुलीचे नशीब बलवत्तर म्हणूनच त्या दोघा तरूणानी जीवाची पूर्वा न करता त्या युवती ला सहीसलामत बाहेर काढले.

ही घटना शनिवारी सायंकाळी राजवाड्यासमोर घडली. घटनेनंतर पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवला असून आपणास चक्कर आल्यानेच तोल जाऊन तलावात पडल्याचे त्या युवतीने म्हटले आहे. या युवतीला वाचवणाऱ्या सावंतवाडीतील दिपेश शिंदे व एकनाथ गावडे या दोघा तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सावंतवाडीतील मोती तलावाकाठी सायंकाळच्या सुमारास आजूबाजूच्या महाविद्यालयातील युवक युवती गप्पागोष्टी मारण्यासाठी बसलेले असतात तसेच काहिसे या महाविद्यालयीन युवती गप्पा गोष्टीसाठी येथील तलावाकाठी बसल्या होत्या अशातच अचानक त्या युवतीला चक्कर आली आणि तोल जाऊन तलावात कोसळली.

या घटनेनंतर एकच खळबळ उडाली ही युवती आरडाओरड करू लागली जीव वाचवण्यासाठी धडपडत असतनाच तिथून दीपेश शिंदे या युवकाने हा प्रसंग बघितला तर तलावाकाठी दररोज सायंकाळी फिरायला जाणाऱ्या एकनाथ गावडे यांनी जीवाची पर्वा न करता थेट तलावात उडी घेतली यावेळी युवती थोडी पाण्यात हलकावे घेत होती असे असतनाच या युवतीला या दोघा युवकांनी वाचविले.व दोरीच्या साह्याने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.पण दोरीने वर काढणे अवघड असल्याने नगरपरिषद च्या होडीने तिला बाहेर काढण्यात यश मिळवले.

दरम्यान या घटनेनंतर पोलिसांकडून ही घटने बाबत खातरजमा केली तसेच मुलीचा जबाब नोंदविला असून यात तिने आपण चक्कर येऊन तलावात पडल्याचे पोलिसांना सांगितले आहे तसेच वडिलांचा ही पोलिसांनी जबाब नोंदवला ही मुलगी सावंतवाडी तील असून येथील शिरोडा नाका परिसरात राहात असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

Web Title: In Sindhudurg, a girl fell into a pond after getting dizzy while chatting; 2 youth save her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.