शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांनी अडवून ठेवलेल्या त्या रुग्णवाहिका तत्काळ सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:48 IST

corona virus Bjp Sindhudurg : जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ताब्यात दिलेल्या त्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे ‍पालकमंत्र्यांनी माघारी घेऊन केवळ उद्घाटनासाठी अडवून ठेवल्याने भाजपाने जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी अडवून ठेवलेल्या त्या रुग्णवाहिका तत्काळ सोडाभाजपाने केला निषेध : जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या कोरोनाची भीतिदायक परिस्थिती आहे. जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या प्रश्नी सामना करावा लागत आहे. त्यातच जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ताब्यात दिलेल्या त्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेकडे ‍पालकमंत्र्यांनी माघारी घेऊन केवळ उद्घाटनासाठी अडवून ठेवल्याने भाजपाने जिल्हा परिषद भवनासमोर ठिय्या आंदोलन केले.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, सरचिटणीस प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांच्या त्या कृतीबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांनी सहभाग घेतला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोज परब, सावंतवाडी सभापती निकिता सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत व प्रसन्ना देसाई, मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दीपक सुर्वे, संतोष गावकर, उपसभापती शितल राऊळ, बांदा सरपंच अक्रम खान, शेर्ले सरपंच जगन्नाथ धुरी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, आडेली सोसायटीचे चेअरमन समीर कुडाळकर आदी उपस्थित होते.उद्घाटनाच्या श्रेयासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी वाशीहून व आरोग्य केंद्रांच्या ताब्यात गेलेल्या रुग्णवाहिका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत पुन्हा माघारी बोलावून घेतल्या. उद्घाटनासाठी शुक्रवारी वेळ दिला आहे. या रुग्णवाहिकांची गरज त्या त्या गावात असताना पालकमंत्र्यांच्या या कृतीबाबत संताप उमटला. ह्यकोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाहीह्ण अशा घोषणा देत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर ठाण मांडले.जिल्ह्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जिल्हा परिषदेने पत्रकारांना लसीमध्ये प्राधान्यक्रम देत लसीकरण सुरू केल्यानंतर पालकमंत्र्यांच्या दबावामुळे प्रशासनाने लसीकरण करण्यास आडकाठी सुरू केली. त्याचे पडसादही या आंदोलनात उमटले.रुग्णवाहिका आरोग्य केंद्राच्या ताब्यात देण्याची मागणीजिल्हाभरातून भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी सिंधुदुर्गनगरी येथे एकवटले व ठिय्या आंदोलनास सुरुवात झाली. तत्पूर्वी राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची भेट घेत या रुग्णवाहिका तत्काळ त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ताब्यात द्या अशी मागणीही केली. खनिकर्म विभागाच्या निधीतून या ६ रुग्णवाहिका मंजूर झाल्या असून पालकमंत्री व खनिकर्म विभागाकडून आदेश प्राप्त होताच त्या सोडण्यात येतील अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBJPभाजपाsindhudurgसिंधुदुर्ग