शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

corona virus -शासकीय, खाजगी क्षेत्रातील बायोमेट्रिक हजेरी तत्काळ बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 1:58 PM

राज्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले असताना, विधान भवन व मंत्रालय आस्थापनाला बायोमेट्रिक हजेरीचा वापर न करण्याबाबत विनाविलंब आदेश काढावेत, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला.

ठळक मुद्देशासकीय, खाजगी क्षेत्रातील बायोमेट्रिक हजेरी तत्काळ बंद कराआमदार निरंजन डावखरे यांची विधान परिषदेत मागणी

मुंबई : राज्यातील शासकीय, निमशासकीय, खाजगी क्षेत्रामधील कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी तत्काळ बंद करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात यावा, अशी मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी आज विधान परिषदेत केली.

राज्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले असताना, विधान भवन व मंत्रालय आस्थापनाला बायोमेट्रिक हजेरीचा वापर न करण्याबाबत विनाविलंब आदेश काढावेत, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला.अर्थसंकल्पीय अधिवेशनात ैपॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन'च्या माध्यमातून विधान परिषदेच्या सभापतींचे लक्ष वेधत आमदार निरंजन डावखरे म्हणाले, ैैकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यासाठी देशातील काही खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंद करण्यात आली आहे.

परंतु, अद्यापपर्यंत राज्य सरकारकडील विभाग, निमशासकीय विभाग, खाजगी आस्थापना, बँक आदी क्षेत्रात बायोमेट्रीक हजेरी न लावण्याबाबत आदेश काढण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने बायोमेट्रिक हजेरी न घेण्यासाठी शासन निर्णय जारी करावा.''

दरम्यान, राज्यात पुणे, नागपूर, ठाणे, मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील लोकसंख्या लक्षात घेता कोरोनाचा फटका हजारो नागरिकांना बसू शकतो. जगभरात सध्या कोरोनामुळे घबराट पसरलेली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर कोरोनाविरोधात जगाने एकजूट होऊन लढण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोनाNiranjan Davkhareनिरंजन डावखरेVidhan Parishadविधान परिषदsindhudurgसिंधुदुर्ग