शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू पकडली, एकाला अटक : उत्पादन शुल्कची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 12:16 IST

सावंतवाडी - मळगाव मार्गावर रेल्वे स्टेशनसमोर गोव्यातून बेकायदा केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली.

ठळक मुद्देअवैध दारू पकडली, एकाला अटक उत्पादन शुल्कची कारवाई

बांदा : सावंतवाडी - मळगाव मार्गावर रेल्वे स्टेशनसमोर गोव्यातून बेकायदा केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या दारु वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली.

या कारवाईत विविध ब्रँडचे ५५ खोके व दारु वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण ७ लाख ६३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आंतोन लॉरेन्स रॉड्रिग्स (३७, किनळे, ता. सावंतवाडी) याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी पहाटेच्या सुमारास करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की, गोव्यातून मळगावमार्गे सावंतवाडी अशी दारू वाहतूक होणार असल्याची माहिती कोल्हापूर भरारी पथकाला खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मळगाव रेल्वे स्टेशनसमोर सापळा रचला होता.

मळगावहून सावंतवाडीकडे जाणारी कार (जीए ०५, डी २४८२) तपासणीसाठी थांबविण्यात आली. तपासणी दरम्यान कारमध्ये विविध ब्रँडचे तब्बल ५५ खोके आढळले. दारू व कार असा एकूण ७ लाख ६३ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी आंतोन रॉड्रिग्ज याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई कोल्हापूर विभागीय उपायुक्त यशवंत पवार व जिल्हा अधीक्षक डॉ. डी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस. एस. साळवे, उपनिरीक्षक जितेंद्र पवार, कुमार कोळी, अमित जगताप, जवान सुहास वरुटे, सुखदेव सीद, प्रदीप गुरव व दीपक कापसे यांच्या पथकाने केली.

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस