शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

आता बदल हवो तर आमदार नवो, सावंतवाडीत बॅनरबाजी; शिंदे गटाकडून कारवाईची मागणी 

By अनंत खं.जाधव | Updated: October 2, 2024 15:44 IST

सावंतवाडी : कसा का बरा हा ना म्हणत अज्ञाताकडून सावंतवाडीत बॅनरबाजी करत ''आता बदल हवो तर आमदार नवो !'' ...

सावंतवाडी : कसा का बरा हा ना म्हणत अज्ञाताकडून सावंतवाडीत बॅनरबाजी करत ''आता बदल हवो तर आमदार नवो !'' अशा आशयाचे बॅनर शहरात लावण्यात आलेत. यातील काही बॅनर फाडून काढून टाकले आहेत पण काही सकाळी उशिरापर्यंत होते. शहरात त्याचीच जोरदार चर्चा सुरू आहे. याबाबत शिंदेसेनेकडून पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली असून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.सावंतवाडी शहरात अज्ञाताकडून मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात उपरोधिक 'बॅनर लावण्यात आला आहे. हे निनावी बॅनर लावून केसरकर यांच्यावर तोफ डागण्यात आली असून आता मोती तलावाच्या काठावर चार दिवे लावलात म्हणजे विकास नाही हे यातून सांगितले आहे. दोडामार्ग, वेंगुर्लेनंतर सावंतवाडी शहरात झळकलेले बॅनर 'चाय पे चर्चे'चा मुद्दा ठरले‌. मालवणी भाषेत या बॅनरवरचा मजकूर असून केसरकरांनी जनतेची कशी फसवणूक केली हे त्यात लिहिले गेले आहे. ''दीपक भाईनू, आम्ही सावंतवाडीकर तुमका आपले समजा होतो. पण दर येळाक आमच्या भावनांची खेळ केलास मवो. इकास, इकास आणि इकास....पंधरा वर्षा निस्ते कडकडतहास. पण भाईनू, ' अशा आशयाचे हे बॅनर आहेत. या बॅनरवर नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे‌. ''सीसीटीव्ही बघून कारवाई करा''या बॅनरबाजीनंतर शिंदे गटाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. विनापरवाना बॅनर लावणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा असे निवेदन दिले आहे. मंत्री केसरकर यांची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न झाला असून परिसरातील सीसीटीव्ही बघून या बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करा असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या उपस्थितीत अॅड नीता सावंत कविटकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, बबन राणे, खेमराज कुडतरकर, गजानन नाटेकर, भारती मोरे, अनारोजीन लोबो, विनायक दळवी आदिनी पोलिसांची भेट घेतली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSawantwadiसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर Crime Newsगुन्हेगारी