न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही
By Admin | Updated: August 12, 2014 23:13 IST2014-08-12T22:18:06+5:302014-08-12T23:13:07+5:30
दुसरा दिवस : ठाकर समाजाचे साखळी उपोषण

न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही
सिंधुदुर्गनगरी : जात पडताळणी समितीकडून ठाकर समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लक्ष वेधण्यासाठी ठाकर बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून साखळी उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरुअसून न्याय मिळेपर्यंत माघार घेणार नाही, असा पवित्रा ठाकर बांधवांनी घेतला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजावर गेली अनेक वर्षे जात पडताळणी समितीकडून अन्याय केला जात आहे. या विरोधात जिल्ह्यातील ठाकर बांधवांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा आणला होता. त्यानंतर त्यांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. मंगळवारी दुसऱ्या दिवशी त्यांचे उपोषण सुरुच असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. ठाकर समाजाने केलेल्या आंदोलनाने शासनाला जाग आली नसेल तर यापुढे हे आंदोलन अधिक तीव्र करून आमरण उपोषण व त्यानंतर मुंडण आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असेही समाजाच्यावतीने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)