शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

आठ दिवसात योग्य तोडगा न काढल्यास जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 14:36 IST

मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवली शहर तसेच तालुक्यात अनेक समस्या निर्माण झाल्या असून येत्या आठ दिवसात यावर योग्य तोडगा काढण्यात न आल्यास जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल.असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देआठ दिवसात योग्य तोडगा न काढल्यास जनआंदोलन !संदेश पारकर यांचा इशारा ; महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवल्या समस्या

कणकवली: मुंबई- गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे कणकवली शहर तसेच तालुक्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. ठेकेदार कंपनीची मनमानी सुरू असून पावसाळ्यात नागरिकांच्या घरात माती तसेच पाणी भरणार आहे. वाहतूक कोंडीची समस्याही मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अशा अनेक समस्या निर्माण झाल्या असून येत्या आठ दिवसात यावर योग्य तोडगा काढण्यात न आल्यास जनआंदोलन करण्यात येईल. वेळप्रसंगी महामार्गाचे काम बंद पाडण्यात येईल.असा इशारा कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी दिला आहे.कणकवली येथील भाजप संपर्क कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना संदेश पारकर म्हणाले, मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाला आमचा विरोध नाही. पण, गेली चार वर्षे या कामामुळे कणकवली शहर तसेच खारेपाटण ते झाराप पर्यंतच्या महामार्ग चौपदरीकरण बाधित जनतेला विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही जनता त्रस्त झाली आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत कोणाकडे न्याय मागायचा हेच या जनतेला समजत नाही . राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच इतर प्रशासकीय यंत्रणा एकमेकांकडे बोटे दाखवत आहेत.कणकवली शहरात महामार्गाचे काम करताना प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला देण्यात आलेला नाही. तरीही प्रकल्प बाधित प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करीत आहेत. मात्र, त्यांच्या त्रासात दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचा विचार या महामार्गाचे काम करताना तसेच आराखडा तयार करताना करण्यात आलेला नाही. त्यामुळे भविष्यात रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. तर शहरातील अंतर्गत नाल्यांचे काम अपूर्ण असल्याने पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणार आहे. सर्व शहरच चिखलमय होणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, श्रीधर नाईक उद्यान, एस.टी . वर्कशॉप , शासकीय विश्राम गृह ,गांगोमंदिर अशा ठिकाणांकडे जाणाऱ्या रस्त्यांचा विचार न केल्याने मोठी अडचण निर्माण होणार आहे. शहरातील पथदीप बंद आहेत. तसेच भूमिगत वीज वाहिन्या यांचे पुढे काय झाले? याचे उत्तर कुठलीच यंत्रणा द्यायला तयार नाही. त्यामुळे जनतेचा जीव मेटाकुटीस आलेला आहे.सर्व्हिस रोडची रुंदी कमी असल्याने वाहतुकीला अडसर निर्माण होत आहे. भविष्यात ही समस्या कायम राहणार आहे. या समस्येला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महसूल यंत्रणा , पोलीस प्रशासन , नगरपंचायत प्रशासन , वीज वितरण यासर्वच यंत्रणा जबाबदार आहेत. त्यामुळे या सर्व यंत्रणांची एकत्रितपणे लोकप्रतिनिधींसह बैठक घेऊन लवकरात लवकर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात गँभिर समस्या निर्माण होणार असून त्याची सर्व जबाबदारी प्रशासणावरच असेल. त्यामुळे येत्या आठ दिवसात याबाबतीत ठोस निर्णय न झाल्यास प्रकल्प बाधितांना घेऊन जनआंदोलन करण्यात येईल.असा इशाराही संदेश पारकर यांनी यावेळी दिला.प्रकल्प बाधितांनी संपर्क साधावा !खारेपाटण ते झाराप या परिसरातील ज्या महामार्ग प्रकल्प बाधितांवर अन्याय झाला असेल त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा.तसेच या जनांदोलनात सहभागी व्हावे .असे आवाहनही संदेश पारकर यांनी यावेळी केले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग