शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:54 IST

Politics, Rajan Teli, Vaibhav Naik, sindhudurg गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकासकामे केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी त्यांच्यात हिंमत असेल तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुक स्वबळावर लढवावी. असे आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे.

ठळक मुद्देहिंमत असेल तर शिवसेनेने निवडणुका स्वबळावर लढवाव्यात : राजन तेली यांचे आव्हान राज्य सरकारने घोषणा केलेल्या कर्जमाफीचे काय झाले ? ते वैभव नाईक यांनी जाहीर करावे

कणकवली: गेल्या वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकासकामे केल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जनतेचा प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्यासाठी त्यांच्यात हिंमत असेल तर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत आणि जिल्हा बँक निवडणुक स्वबळावर लढवावी. असे आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहे.कणकवली येथील भाजपा कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राजन तेली म्हणाले, निवडणुका जाहीर होण्याअगोदरच महाविकास आघाडीच्यावतीने एकत्रित निवडणुका लढवणार ही भूमिका शिवसेना खासदार व आमदार घेत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात भाजपची ताकद वाढली आहे हे स्पष्ट होत आहे. ठाकरे सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केवळ घोषणा करुन जनतेची दिशाभूल सत्ताधारी करत आहेत.ठाकरे सरकारला एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर भाजपाच्यावतीने सरकारच्या विरोधात संपूर्ण राज्यात पत्रकार परिषदा घेण्यात आल्या . पक्ष आदेशाप्रमाणे प्रदेश सरचिटणीस असलेल्या आमदार रविंद्र चव्हाण यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनीही त्यादिवशी पत्रकार परिषद घेतली.सरकारने एक वर्षाचा कालावधी पूर्ण करताना जनतेची कशी दिशाभूल केली ? याबाबत त्यात माहिती देण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे वरीष्ठ नेते आहेत. राज्यात जी जबाबदारी त्यांना दिली त्यांनी ती पार पाडली. त्यामुळे आमदार वैभव नाईक यांनी चुकीचे मुद्दे चर्चेत आणून कोणताही फरक पडणार नाही.एसटीचे ३०० चालक - वाहक मुबंईला गेले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे .ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. एका आठवड्यात एसटीच्या सर्व फेऱ्या सुरु न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.आमदारांकडे आलिशान गाडया आहेत.पण एसटीने गोरगरीब नागरिकांना व विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागतो. शाळा,विद्यालयात विद्यार्थी व अन्य लोक एसटीने येत आहेत. सातत्याने एसटीचे प्रश्न का निर्माण होत आहेत ? शिवसेनेचे मंत्री त्यासाठी सक्षम नाहीत का ? कर्मचाऱ्यांना पगार दिले जात नाहीत याला जबाबदार कोण ? हे आमदार नाईक यांनी सांगावे.निवडणुकीपूर्वी जिल्ह्यातील नवीन बसस्थानकांची भूमिपूजने करण्यात आली होती. ती पूर्ण झाली आहेत का ? असा सवालही त्यांनी यावेळी केला. माजी पालकमंत्री यांनी निवडणूकीच्या तोंडावर काही भूमिपूजने केली होती ,त्यांचे काय झाले ? या प्रश्नांची उत्तरे आधी शिवसेनेने द्यावीत. शिवसेना जिल्ह्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे. सत्ता असूनही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना न्याय मिळत नाही. आरोग्य सेवा कोलमडली आहे. शेकडो पदे रिक्त असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री असून देखील जनतेला न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे.नुकसान भरपाईचे ६५ कोटी फडणवीस सरकारच्या काळात मंजूर झालेले होते. जिल्हा नियोजन आराखडा अडीचशे कोटीचा होता तो १४० कोटींवर आणला आहे. त्याबाबत शिवसेनेने बोलावे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालय चालू केल्यास आम्ही भाजपच्यावतीने शिवसेना नेत्यांचा जाहीर सत्कार करु. मात्र, त्या केवळ घोषणा ठरु नयेत .जिल्हा आरोग्य विभागात ५३६ रिक्त पदे आहेत ती अगोदर भरा.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे काय झाले? ते पैसे अजून मिळाले नाहीत .सरकारवर ५ .२ लाख हजार कोटीचे कर्ज आहे .महसुली तूट ३५ हजार कोटी झाली आहे.भात नुकसानभरपाई पैसे आलेले नाहीत. त्यामुळे केवळ हवेत गोळीबार करू नये . असेही राजन तेली यावेळी म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणRajan Teliराजन तेली Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग