शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार भाजप विचाराचा हवा - मंत्री रविंद्र चव्हाण 

By अनंत खं.जाधव | Updated: April 20, 2023 14:27 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास या भूमिकेला खऱ्या अर्थाने चालना दिली

सावंतवाडी : देशाला महासत्ता बनवायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला चारशे खासदार निवडून आणावे लागतील. त्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरीचा खासदार हा भाजपच्या विचाराचा निवडून आणावा लागेल. त्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजपचा विचार घराघरात पोचवावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी  केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गांधी चौकात भाजपच्या महाविजय रॅलीची समारोप सभेत ते बोलत होते.यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, शैलेंद्र दळवी, माजी नगराध्यक्ष संजू परब आदी. उपस्थित होते.मंत्री चव्हाण म्हणाले, सबका साथ सबका विकास या भूमिकेला खऱ्या अर्थाने कुणी चालना दिली असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. त्यामुळेच 14 वित्त आयोगाचा पैसा प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळू लागला. देश आज वेगळ्या दिशेने चालला आहे. हे फक्त मोदींमुळेच शक्य झाले. दोन खासदारापासून सुरू झालेली भाजप आज देशात एक नंबर वर आहे. त्याग आणि समर्पण मधून निर्माण झालेली भाजपा आहे. कधी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता पक्षाचा विचार घेऊन अनेक कार्यकर्ते पुढे जात आहे. कोलगाव ग्रामपंचायत चे कौतुक करतो त्यानी पारदर्शकता दाखवून दिली सर्वाना आता डिजिटलमधून गेल पाहिजे असे आवाहन मंत्री चव्हाण यांनी केले.जिल्हा नियोजनचे पैसे शंभर टक्के खर्च करण्यात आले त्याचे श्रेय घ्यायला शिका. अधिकारी चुकीच्या पध्दतीने वागत असतील तर कार्यकर्त्यांनी शांत राहून चालणार नाही. सर्व सामान्य जनतेचा पैसा त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे. मागील अडीच वर्षांत निधी आला नाही, पण मागील नऊ महिन्यात मोठ्या प्रमाणात निधी आला. त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या अभिनंदनाचे ठराव ग्रामपंचायतीत घेतले गेले पाहिजे असे आवाहनही मंत्री चव्हाण यांनी केले.निलेश राणे म्हणाले, मागील काही वर्षात जिल्ह्यात निधी येण्याचे प्रमाण कमी झाले होते. मागच्या अडीच वर्षांत कोविडचे कारण देत नियोजनचा निधी कमी केला. महाराष्ट्रात सर्वाधिक ग्रामपंचायती सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपच्या निवडून आल्या त्यामुळे आम्हाला जास्ती जास्त निधी मिळावा असे आवाहन राणे यांनी केले.तेली म्हणाले, कोण कुठे जाणार मला माहित नाही. मला भाजपने एवढे प्रेम दिल ते मी कधीही विसरू शकणार नाही. शतप्रतिशत भाजप म्हणून काम करूया येथील जनतेने एवढे भरभरून प्रेम दिले, मोठ्याप्रमाणात ग्रामपंचायती भाजपकडे आहेत. त्यामुळे भविष्यात ही भाजपला येथील जनता साथ देईल असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा