शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 20:12 IST

राज्यातील शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय कर्मचाºयांना शासनाकडून कायम दुय्यम स्थान देत त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेने केला आहे. तसेच आपल्या रास्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले आहे, अशी माहिती परिषदेचे सचिव व्ही. एस. तारी यांनी दिली.

ठळक मुद्दे मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेने शासनाचे लक्ष वेधले

सिंधुदुर्गनगरी : राज्यातील शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय कर्मचाºयांना शासनाकडून कायम दुय्यम स्थान देत त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेने केला आहे. तसेच आपल्या रास्त मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले आहे, अशी माहिती परिषदेचे सचिव व्ही. एस. तारी यांनी दिली.राज्यातील लिपीक संवर्ग हा प्रशासनाचा कणा असून शासनाच्या सर्वच महत्वाकांशी योजना प्रभावीपणे अंमलबजावणी करणारा महत्त्वाचा घटक आहे. असे असले तरी या लिपीक संवर्गला शासनाकडून नेहमीच दुजेभावाची वागणूक दिली जात आहे. तसेच त्यांचा मागण्यांकडेही हेतुपुरस्कर दुर्लक्ष केला जात आहे. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १२ सप्टेंबर २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत निवेदन सादर करण्यात आले.

त्यावेळी संघटनेसोबत लवकरच बैठक घेऊन मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने २७ नोव्हेंबर २०१८ रोजी आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत लवकरच मागण्या मान्य केल्या जातील असे आश्वासन दिले. मात्र त्यावरही काही कार्यवाही झाली नाही.

वारंवार शासनाचे लक्ष वेधूनही शासन आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने राज्यातील लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. मात्र आज पुन्हा एकदा लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आली. याचाच एक भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन सादर करण्यात आले असल्याची माहिती व्ही एस तारी यांनी दिली.महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेच्यावतीने लिपीकसंवर्गीय कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे वारंवार शासनाचे लक्ष वेधले जात आहे मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने लवकरच आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेने शासनाला दिला आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग