‘आयडियल’चे स्नेहसंमेलन कार्यक्रमांनी रंगले
By Admin | Updated: December 27, 2014 00:03 IST2014-12-26T21:20:33+5:302014-12-27T00:03:49+5:30
यावर्षी आदर्श परिचारिका पुरस्कार अनुराधा केलवलकर नर्सिंग स्कूलची आदर्श विद्यार्थिनी म्हणून नम्रता मुसळे व सोनाली पाटील यांना देण्यात आला

‘आयडियल’चे स्नेहसंमेलन कार्यक्रमांनी रंगले
कणकवली : ल. गो. सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुक येथे डॉ. राजअहमद पटेल रंगमंचावर आयडियल नर्सिंग स्कूल कणकवलीचे वार्षिक स्रेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईच्या निवृत्त एसीपी फिरोज पटेल होते. ज्ञानदा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिल ठाकूर, उपाध्यक्ष प्रा. हरिभाऊ भिसे, आयडीयल नर्सिंग स्कूलचे चेअरमन बुलंद पटेल, पंचायत समिती उपसभापती बाबासाहेब वर्देकर, हरकुळ बुदु्रक सरपंच आनंद ठाकूर, दयानंद उबाळे, व्ही. एल. तांबे, बाळकृष्ण पेडणेकर, इस्माईल पटेल, तानावडे, मोहन सोहनी, जाधवर, गणेश घाडीगावकर, मुख्याध्यापक सावंत, पांडुरंग परब, आदी उपस्थित होते. फिरोज पटेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. प्रा. हरिभाऊ भिसे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अनिल ठाकूर, सरपंच आनंद ठाकूर, उपसभापती बाबासाहेब वर्देकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी फिरोज पटेल, बाबासाहेब वर्देकर, आनंद ठाकूर यांचा तसेच मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. सोनाली पाटील, सुरेखा कानडे, नम्रता मुसळे, भक्ती परब, अनुराधा केलवलकर यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावर्षी आदर्श परिचारिका पुरस्कार अनुराधा केलवलकर हिला देण्यात आला. नर्सिंग स्कूलची आदर्श विद्यार्थिनी म्हणून नम्रता मुसळे व सोनाली पाटील यांना प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.फिरोज पटेल यांनी परिचारिका क्षेत्राचे महत्त्व पटवून दिले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्या तेजस्वी बोंद्रे, सोनम आचरेकर यांनी विशेष प्रयत्न केले. चेअरमन बुलंद पटेल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)