मी बोलेन तेच सिंधुदुर्गात होईल : नारायण राणे

By Admin | Updated: August 3, 2014 22:46 IST2014-08-03T21:58:24+5:302014-08-03T22:46:57+5:30

मराठा आरक्षण कायदेशीरदृष्ट्या टिकेल

I will say that in Sindhudurg: Narayan Rane | मी बोलेन तेच सिंधुदुर्गात होईल : नारायण राणे

मी बोलेन तेच सिंधुदुर्गात होईल : नारायण राणे

कोल्हापूर : सिंधुदुर्गातील राजकारण बरोबर ट्रॅकवर आहे. या ठिकाणी मी जे बोलेन, तेच होईल. माझी राजकारणातील पुढील भूमिका मंगळवारी जाहीर करीन. मराठा आरक्षण कायदेशीरदृष्ट्या टिकेल, त्याबाबतची काळजी घेतली आहे, अशी माहिती उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज, रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी ते कोल्हापुरात आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. मंत्री राणे म्हणाले, मी जे म्हणेल तेच सिंधुदुर्गात होईल. येथील राजकारण बरोबर ट्रॅकवर आहे. राजकारणातील माझी पुढील भूमिका मंगळवारी जाहीर करणार आहे. मराठा आरक्षणाचा अहवाल कायदेशीरदृष्ट्या अचूकपणे केला आहे. त्यात कोणतीही त्रुटी ठेवलेली नाही. आरक्षणासाठी भारतीय राज्यघटनेतील कलम १५ (४), १६ (४) मधील तरतुदींचा आधार घेतला आहे. शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध केले आहे. आवश्यक ते पुरावे गोळा केलेत. त्यामुळे न्यायालयात आरक्षण कायदेशीदृष्ट्या टिकेल. विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आरक्षणाबाबतच्या सूचना माध्यमांद्वारे न करता आम्हाला प्रत्यक्ष भेटावे, दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून घेतला जाईल. (प्रतिनिधी)
त्या माणसाची बुद्धिमत्ता काय ?
सावंतवाडीपुरता मर्यादित असलेला माणूस राज्याच्या हितासाठी म्हणून आमदारकीची मुदत संपण्यासाठी एक महिना बाकी असताना राजीनामा देतो. पाच वर्षांत काहीही काम न करणाऱ्या त्या माणसाची बुद्धिमत्ता काय? असा टोला त्यांनी नाव न घेता आमदार दीपक केसरकर यांना लगावला.

Web Title: I will say that in Sindhudurg: Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.