शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:46 IST

मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश असेल, असे सूचक वक्तव्य काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. कुडाळ येथील आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान नारायण राणे बोलत होते. 

ठळक मुद्देमला दिर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच मंत्रिमंडळात समावेशमागील तीन वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा दहा वर्ष मागेकोकणात होवू घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला विरोध

कुडाळ: मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश असेल, असे सूचक वक्तव्य काँग्रेस सोडून स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले आहे. कुडाळ येथील आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान नारायण राणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विकासाबाबत बोलायचे झाल्यास मागील तीन वर्षात सिंधुदुर्ग जिल्हा दहा वर्ष मागे गेल्याची आजची स्थिती आहे. निवडणुकांच्या काळात करण्यात आलेला जाहीरनामा व घोषणांची अंमलबजावणी अद्याप करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील रस्ते खड्डेमय झाले आहेत. आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असून येथील महसूल विभाग जनतेचे शोषण करत आहे. संपूर्ण जिल्ह्यात भ्रष्टाचार फोफावला आहे. तसेच, येथील अधिकारी बेजबाबदारपणे वागत आहेत. याचबरोबर, विमानतळाचे काम संथगतीने सुरु आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाची सुद्धा तशीच अवस्था आहे. एमआयडीसीचे काम सुरू नाही. जिल्हा नियोजन कामाला कट बसला आहे, असे सांगत नारायण राणे यांनी या सर्वाला जिल्ह्याचे पालकमंत्री जबाबदार धरले आहे. पालकमंत्र्यांना अधिकारी ऐकत नाहीत हे दुर्दैव असून गेल्या तीन वर्षात शून्य काम असणारे निष्क्रिय पालकमंत्री असल्याची टीका नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर केली आहे.  तसेच, कोकणात होवू घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला सुद्धा नारायण राणे यांनी विरोध दर्शविला आहे. याचबरोबर, नारायण राणे यांनी मंत्रिपदाबद्दल सूचक वक्तव्य करताना सांगितले, की मला दीर्घकाळ थांबण्याची सवय नाही, लवकरच माझा मंत्रिमंडळात समावेश असेल. दरम्यान, स्वाभिमान पक्ष सभासद नोंदणी 1 फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. राज्यात पक्ष संघटना वाढवत असताना जिल्ह्यातील तीनही विधानसभेच्या जागा आणि खासदार विजयी करणे, हा स्वाभिमान पक्षाचा संकल्प आहे. तसेच, स्वाभिमान पक्षाचे संपर्क अभिमानही सुरू होणार असल्याचेही यावेळी नारायण राणे यांनी सांगितले.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर