शहरं
Join us  
Trending Stories
1
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
2
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
3
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
4
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
5
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
7
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
8
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
11
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
13
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
14
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
15
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
16
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
17
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
18
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
19
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
20
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक स्वच्छतेची ऐशी की तैशी

By admin | Updated: January 7, 2015 00:08 IST

शहराचा मध्यवर्ती प्रभाग : तुंबलेल्या गटारी, बंद शौचालये, दूषित पाण्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न

कोल्हापूर : रस्त्यातूनच गटारी, शौचालये तुंबल्याने पसरलेली दुर्गंधी अशा विविध समस्यांनी कनाननगरमधील नागरिक हैराण आहेत. दूषित वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, महापालिका यंत्रणा सुस्त असल्याची येथील नागरिकांची तक्रार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, नागाळा पार्क व शाहूपुरी यांच्यामधील झोपडपट्टीच्या भागाचा कनाननगर प्रभागात समावेश होतो. झोपडपट्टीचा भाग असला तरी गल्लीमधील रस्ता हा मोठा आहे. शहराच्या इतर प्रभागांपेक्षा येथे कचरा उठाव चांगल्या प्रकारे होतो. त्याचबरोबर पाणीपुरवठा नियमित होत असल्याचे नागरिकांचे मत आहे. येथे खरी समस्या आहे ती गटारींची. गेली अनेक वर्षे गटारी न झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांतूनच गटारींचे पाणी वाहते. अनेक ठिकाणी गटारी तुंबल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. झोपडपट्टीत अंतर्गत रस्त्यांची तर चाळण झालेली आहे. गल्लीतून जाताना बारकाईने पाहिल्यानंतर येथे डांबरीकरण झाले होते, याचा अंदाज येतो. इतके रस्ते खराब झालेले आहेत. कनाननगराच्या पूर्वेकडे निम्म्याहून अधिक प्रभागांतील शौचालयांचे सांडपाणी एकत्रित जमा होते. सांडपाण्याची पाईप बंद पडल्याने पाईपमधून सगळे पाणी बाहेर आले आहे. यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. शेजारी राहणाऱ्यांना नाक व तोंड दाबून धरूनच घराबाहेर पडावे लागते. शौचालयाचे सांडपाणी पुढे सरकत नसल्याने सार्वजनिक शौचालये बंद झाली आहे. यामुळे लहान मुलांना उघड्यावर शौचास बसावे लागत आहे. परिणामी अस्वच्छतेमध्ये अधिक भरच पडत आहे. झोपडपट्टी परिसरापेक्षा संचार कॉलनी, घोरपडे गल्ली येथे फारशा समस्या दिसत नाहीत. प्राथमिक शाळेची व्यवस्था व दर्जा बऱ्यापैकी असल्याचे नागरिकांचे मत आहे. शहरातील इतर झोपडपट्ट्यांच्या तुलनेत येथे पाणीपुरवठा सुरळीत आहे. स्ट्रीट लाईट व कचरा उठाव व्यवस्थित असल्याचे नागरिकांतून सांगण्यात आले. आमदार, खासदार करतात काय ?नगरसेवकांवर मर्यादास्थानिक नगरसेवकांचा सतत संपर्क असतो; पण रस्ते व गटारींसाठी त्यांच्याकडे निधी उपलब्ध होत नसल्याने हे प्रश्न सोडविण्याकामी त्यांच्यावर मर्यादा येत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होतात. गेले चार वर्षांत दोन कोटींची कामे केली आहेत. काही भागांत गटारी व शौचालयांचा प्रश्न आहे, ते मान्य करावेच लागेल; पण ड्रेनेजचा प्रश्न सोडविण्यासाठी एक कोटीचा प्रस्ताव महापालिकेकडे पाठविलेला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक शौचालयांसाठीही तरतूद केली असून, रस्त्यांसाठी ७५ लाख रुपये मंजूर आहेत. ट्रेड सेंटर, सासने ग्राऊंड परिसरात रस्त्यांची कामे सुरू असून, उर्वरित प्रभागातही लवकरच ती सुरू करणार आहोत. - सरस्वती दिलीप पोवार (नगरसेविका) प्रमुख समस्या अस्वच्छतेमुळे डासांचे साम्राज्यड्रेनेजची सुविधा नाहीदुषित पाणीपुरवठाअंतर्गत रस्त्यांची दुरवस्थाविकासकामांचा दावाशहरातील इतर झोपडपट्ट्यांच्या तुलनेत सुरळीत पाणीपुरवठास्ट्रीट लाईटची सोय चांगलीस्थानिक नगरसेवकांचा नियमित संपर्क वेळेवर कचरा उठाव .