शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी संघटनेचे उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 11:28 IST

ओरोस : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकींच्या मानधनात शासनाने जून महिन्यापासून ५०० रुपयांची वाढ केली आहे. मात्र, हे मानधन ...

ठळक मुद्देशालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी संघटनेचे उपोषणकामगारांना न्याय मिळावा म्हणून जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर आंदोलन

ओरोस : शालेय पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकींच्या मानधनात शासनाने जून महिन्यापासून ५०० रुपयांची वाढ केली आहे. मात्र, हे मानधन हातात येण्यापूर्वीच डिगस हायस्कूल, आंब्रड हायस्कूल व जिल्हा परिषद आजगाव शाळेने चक्क स्वयंपाकी कामगार महिलांना कामावरून कमी केले. या कामगारांना न्याय मिळावा म्हणून सोमवारी जिल्हा परिषद प्रवेशद्वारासमोर शालेय पोषण आहार स्वयंपाकी संघाच्यावतीने उपोषण सुरू करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीने स्वयंपाकी कामगारांची नेमणूक करावयाची आहे. मात्र, त्यांना कामावरून केव्हा कमी करता येईल याचे काही नियम शासनाने तयार केले आहेत. १० जुलै २०१४ च्या परिपत्रकानुसार स्वयंपाकी नियुक्त करीत असताना गावातील परित्यक्ता, विधवा, गरजू गरीब महिलांना निवडावे तसेच मागासवर्गीयांनाही प्राधान्य द्यावे असे आदेश आहेत.

जिल्हा परिषद आजगाव प्राथमिक शाळेत स्वयंपाकी महिलांना कामावरून काढून त्याठिकाणी पुरुष कामगारांना ठेवण्यात आले आहे. सलग तीन दिवस आहारात खंड पडल्यास किंवा महिन्यातून पाच दिवस खंड पाडणाऱ्यांना कामावरून काढून टाकता येईल असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.स्वयंपाकींंना सरसकट कमी केले जाऊ नये असेही या निर्णयात म्हटले आहे. असे असतानाही काही शाळा व्यवस्थापन समित्या मनमानी करीत केव्हाही स्वयंपाकी कामगारांना काढून टाकण्याचा निर्णय घेताना दिसतात. आजगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांनी लेखी लिहून दिले आहे की दरवर्षी स्वयंपाकी बदलण्यात यावा. त्यामुळे अशा मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी यांनी शासनादेश तसेच निर्णयाची माहिती द्यावी.

संघटनेची तक्रार, संस्थेचा खुलासा यातून शिक्षणाधिकारी यांनी योग्य बाजू तपासून घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घ्यायचा आहे. असे असतानाही शाळा व्यवस्थापनकडून महिला स्वयंपाकींना अन्यायकारकरित्या कामावरून काढले जाते. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा यासाठी संघटनेच्या अक्षता मेस्त्री, सुप्रिया तेली, श्रद्धा दळवी या स्वयंपाकींसह संघटनेच्या अध्यक्षा कमल परुळेकर, उपाध्यक्ष सूर्यकांत सावंत आदींसह १० ते १५ महिला उपोषणास बसल्या आहेत.रणजित देसाई यांच्या मध्यस्थीनंतर स्थगितजिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित देसाई, शिक्षण सभापती अनिशा दळवी, प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी उपोषणस्थळी भेट देत शिक्षणाधिकारी आल्यावर आपण यावर तोडगा काढू असे आश्वासित केल्यानंतर स्वयंपाकींचे हे आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचेही संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग