शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

कमिशन घेणारा उमेदवार कसा?

By admin | Updated: September 28, 2014 00:15 IST

नारायण राणे : राजन तेलींवर टीका

सावंतवाडी : पंढरपूर येथून चुकून एक बडवा आमच्याकडे आला होता. पण आता या बडव्याला पुन्हा ट्रान्सफर केले असून कोणाला न आवडणारी व्यक्ती म्हणजे राजन तेली आहे. या मतदारसंघात काँग्रेसची लढत शिवसेनेच्या दीपक केसरकर व राष्ट्रवादीच्या सुरेश दळवी यांच्याशीच असल्याचे सांगत नारायण राणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार राजन तेली यांच्यावर जोरदार तोफ डागली. कमिशन घेणारा कधी उमेदवार होऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस नेते नारायण राणे हे शनिवारी सावंतवाडीत आले होते. यावेळी त्यांच्यासोबत माजी खासदार नीलेश राणे, युवा नेते नीतेश राणे, संदेश पारकर, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, दत्ता सामंत, विकास सावंत, संजू परब, सभापती प्रमोद सावंत, उमेदवार बाळा गावडे, डॉ. जयेंद्र परूळेकर आदी उपस्थित होते.यावेळी राणे म्हणाले, राज्यात आम्ही प्रचारात उतरल्यावर सर्वांवर टीका करणार. त्यात राष्ट्रवादीलाही सोडणार नाही. राज्यात सर्वत्र मी प्रचारासाठी फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात आमच्या विरोधात लढण्यासाठी एकही लायक उमेदवार नसल्याची टीका त्यांनी केली.सावंतवाडीत काँग्रेसची लढत शिवसेना व राष्ट्रवादीशी होणार आहे. भाजप कुठेच या स्पर्धेत असणार नाही, असे राणे म्हणाले. भाजपाच्या संस्कृतीत सावंतवाडीत न राहणारे आणि जिल्ह्यात कोणाला न आवडणारे उमेदवार कसे काय चालले, याचा शोध घ्यावा लागेल. तेली हे टक्केवारीचे उमेदवार आहेत. मायनिंग तसेच अन्य लोकांकडून पैसे काढण्याचे काम हे करतील. पंढरपूरच्या विठोबाकडे यापूर्वी बडवे असायचे, त्यातील एक बडवा सिंधुदुर्गात आला. राजन तेलीमुळे अनेकजण मला भेटण्यास येत नव्हते, ते आज मला मुक्तपणे भेटत आहेत. या तालुक्यात संबंध नसणारी व्यक्ती कशासाठी येते, याचा शोध घ्या. सकाळी एक आणि संध्याकाळी दुसरा पक्ष बदलणारा उमेदवार कधीही आमदार होणार नाही, अशी टीका केली. यापूर्वी सावंतवाडीतील अपयशाला तेलीच जबाबदार असून त्यामुळेच आम्हाला आतापर्यंत शून्य पाहाता आला. आमदार विजय सावंत हे अपक्ष राहिले तरी आमच्यावर त्यांचा परिणाम होणार नाही. आतापर्यत ते बंडखोरी करत आले आहेत. दोन इमारती बांधल्या म्हणजे विकास झाला का, लोकांसाठी काय केले? नाटळ ग्रामपंचायतीत एक सदस्य निवडून न आणू शकलेले काय लढत देणार, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस विकासाचा मुद्दा घेऊन लढणार आहे. भाजपाने देशातील जनतेची फसवणूक केली असून निवडणूकपूर्वी २४ सिलिंडर देणारे आता बारा सिलिंडर देत असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)