शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

जिल्हा परिषद शाळांमध्ये वॉटर बेल संकल्पना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 20:35 IST

क्रीडा शिष्यवृत्ती लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या गणवेशाची दरपत्रक मागितली आहेत. अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली. प्रशासकीय कामांच्या मान्यता मिळाल्यानंतर त्याच वर्षात काम पूर्ण करा, अशा सूचना सभापतींनी दिल्या.

ठळक मुद्देशिक्षण समितीची सभा : सभापतींचे तत्काळ अंमलबजावणीचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : शालेय जीवनात विद्यार्थ्यांचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी वेळेत व आवश्यक पाणी पिणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदच्या १४१४ शाळांमध्ये ह्यवॉटर बेल ही संकल्पना राबविणार असल्याचे सांगून शिक्षण सभापती डॉ. अनिशा दळवी यांनी याची तत्काळ अंमलबजावणी करा असे आदेश दिले. शाळा सुरू असतानाच्या कालावधीत मुलांनी अर्धा लिटर पाणी प्यायला हवे, याकडे शिक्षकांनी लक्ष द्या अशा सूचनाही दळवी यांनी केल्या.

जिल्हा परिषद शिक्षण समितीची मासिक सभा सभापती डॉक्टर अनिशा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बॅरिस्टर नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सचिव तथा प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, समिती सदस्य उन्नती धुरी, राजन मुळीक उपस्थित होते.

सभापती दळवी यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी चर्चा घडवून आणली. प्रत्येक शाळेत स्वयंपाक मदतनीस आहे का?, पिण्याच्या पाण्याची सोय आहे का? पोषण आहारावर विशेष लक्ष दिला जातो का? यासह अन्य प्रश्न सचिव तथा शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना विचारले. आंबोकर म्हणाले, जिल्हा परिषदच्या १४०० शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. फक्त कणकवली तालुक्यातील फोंडा व बेळणे तर मालवण तालुक्यातील बांदिवडे तेरई शाळेत पाण्याची व्यवस्था नाही. या ठिकाणी अन्य ठिकाणावरून पाणी आणून विद्यार्थ्यांची तहान भागवली जाते. यावर सभापती यांनी मुलं योग्य पोषण आहार व स्वछ पाणी पितात का? दररोज अर्धा लिटर पाणी विद्यार्थी पितात का? याकडे शिक्षकांनी लक्ष द्या. तसेच दर दोन तासांनी विद्यार्थ्यांनी एक ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

यासाठी वॉटर बेल ही संकल्पना अमलात आणा. वॉटर बेल झाली की विद्यार्थ्यांनी पाणी प्यावे, याकडे शिक्षकांनी लक्ष द्या, असे आदेश सभापतींनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. क्रीडा शिष्यवृत्ती लवकरच विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया गणवेशाची दरपत्रक मागितली आहेत. अशी माहिती शिक्षणाधिकारी यांनी दिली. प्रशासकीय कामांच्या मान्यता मिळाल्यानंतर त्याच वर्षात काम पूर्ण करा, अशा सूचना सभापतींनी दिल्या.शालेय क्रीडा स्पर्धांचे नियोजन पूर्णशालेय बाल कला व क्रीडा महोत्सवाची माहिती उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांनी दिली. आंगणे म्हणाले, २ ते १० डिसेंबर या कालावधीत केंद्रस्तरावर स्पर्धा होणार आहेत. १२ ते १७ डिसेंबर या दरम्यान प्रभागस्तरावर स्पर्धा होणार आहे. २० ते २४ डिसेंबर या कालावधीत तालुका स्तरावर तर ३०,३१ व १ जानेवारीमध्ये ओरोस येथील डॉन बॉस्को हायस्कूल येथे जिल्हास्तरीय स्पर्धा होणार आहे. प्रत्येक खेळाची नियमावली तयार करून ती संबंधितांकडे पाठवली जाणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्याच्या ११०० खेळाडूंना स्पोर्ट्स शूज दिले जाणार आहेत. अशी माहिती आंगणे यांनी दिली. तर जिल्हास्तरावर आलेल्या विद्यार्थ्यांना वेगेळे गिफ्ट देण्याचा विचार असल्याचे शिक्षणाधिकारी आंबोकर यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळाzp schoolजिल्हा परिषद शाळा