मानवतेचे कार्य करणारी माणसे वंदनीय
By Admin | Updated: April 17, 2015 00:20 IST2015-04-16T21:18:42+5:302015-04-17T00:20:58+5:30
अरविंद खानोलकर : ‘अणाव’च्या आनंद आश्रमाला देणगी

मानवतेचे कार्य करणारी माणसे वंदनीय
बांदा : समाजातील निराधार, वृद्ध, पीडित व अनाथांची सेवा करण्याचा वसा जीवन आधार सेवा संस्थेने घेतला आहे. संस्थेच्या अणाव येथील आनंद आश्रमात व पणदूर येथील सविता आश्रमात सुरू असलेल्या मानवसेवेच्या कार्याचे वर्णन शब्दांत करता येणार नाही. अतिसामान्य व समाजाने त्यागलेल्यांची सेवा आनंदाने करणारी ही माणसे वंदनीय आहेत. निराधारांना जीवनाचा खरा आधार देणाऱ्या या संस्थेचे कार्य असामान्य आहे, असे गौरवोद्गार प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ अरविंंद खानोलकर यांनी अणाव येथे काढले.बांदा येथील श्री भूमिका माऊली भजन मंडळातर्फे जीवन आधार संस्थेच्या आनंद आश्रमाला देणगी दिली. त्यावेळी डॉ. खानोलकर बोलत होते. बांदा येथील २५ वर्षांहून अधिक काळ भजन परंपरा जपणाऱ्या या मंडळातर्फे अणाव येथील आनंद आश्रमाला १५ हजारांची देणगी दिली. यावेळी मंडळाच्या सदस्या गीता पावसकर, सुप्रिया जोशी, दर्शना कल्याणकर, संध्या गोवेकर,
रमा धारगळकर, शैलजा महाजन आदींसह डॉ. अरविंंद खानोलकर, अपर्णा खानोलकर, दत्ताराम सडेकर, सुहासिनी सडेकर, दिवाकर नाटेकर, आशुतोष भांगले, गायत्री भांगल, आदी उपस्थित होते.या सेवाभावी संस्थेच्या बबन परब यांनी सर्वांना संस्थेच्या
कार्याची माहिती दिली. याप्रसंगी त्यांच्यासमवेत या कार्यात मोलाचा वाटा असलेल्या सविता परब, तसेच आबा अणावकर, प्रमोद नाईक, तुळसा जाधव, महेश्वरी अणावकर, मारुती दळवी, अक्षय दळवी, सावित्री जाधव उपस्थित होते.
यावेळी दिवाकर नाटेकर, दत्ताराम सडेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. महिला मंडळाच्या सदस्यांनी आश्रमातील वृद्धांच्या सहवासात भजन गायन केले. (प्रतिनिधी)