शहरं
Join us  
Trending Stories
1
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
2
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
3
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
4
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
5
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
6
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
7
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
8
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
9
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
10
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
11
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
12
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
13
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
14
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
15
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
16
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
17
Dance Bar Raid: उल्हासनगरातील चांदणी लेडीज सर्व्हिस बारवर पोलिसांची धाड, ९ महिलांसह १५ जणांना अटक
18
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
19
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
20
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या

मनोरूग्ण महिलांना हक्काचे घर!

By admin | Updated: October 16, 2015 00:08 IST

न्यायालयाचे आदेश : पंधरा वर्षांनंतर ओलांडणार घराचा उंबरठा

रत्नागिरी : प्रादेशिक मनोरूग्णालयात गेली १५ वर्षे दाखल असलेल्या दोन भगिनीना त्यांच्या हक्काचे घर मिळाले आहे. या दोन भगिनींना घरी नेण्यासाठी न्यायालयाने आदेश बजावल्यामुळे त्यांचे नातेवाईक बुधवारी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. दोघीही घरी जाण्यासाठी अधीर झाल्या होत्या.मनोरूग्णालयात दाखल केल्यावर त्यांना पुन्हा घरी नेण्याची मानसिकता असतेच असे नाही. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे या दोन भगिनींना आपल्या घरी जाण्याची संधी मिळणार आहे. पुष्पलता गायकवाड (कोल्हापूर) या २०११ साली प्रादेशिक मनोरूग्णालयात दाखल झाल्या होत्या. मात्र उपचाराअंती त्या बऱ्या झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून त्यांचे नाव, गावाचे नाव विचारण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. गायकवाड यांचे वडील त्यांना घरी नेण्यासाठी मनोरूग्णालयात बुधवारी दाखल झाले होते.राणी दबडे (बत्तीसशिराळा) नामक मनोरूग्ण महिला २००० साली मनोरूग्णालयात दाखल झाली होती. ही महिलाही बरी झाल्यानंतर तिच्या गावी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी घर बंद असून, भाऊ मुंबईला राहात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तलाठ्याशी संपर्क साधून तिच्या घराचा सातबारा व माहिती मिळवण्यात आली. त्यावेळी दोन्ही भाऊ जवळच राहत असल्याची माहिती मिळाली. कायद्यानुसार राणीचे हक्क अबाधित असून, तिला घरी घेऊन जाण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यानुसार तिचा भाऊ घरी नेण्यासाठी मनोरूग्णालयात दाखल झाला होता.प्रादेशिक मनोरूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पराग पाथरे, मनोविकारतज्ज्ञ डॉ. अतुल ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारीवर्ग मनोरूग्णांवर उपचार करीत असतात. बऱ्या झालेल्या मनोरूग्णांना त्यांच्या हक्काच्या घरी पाठवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी नितीन शिवदे, वीणा गणवीर यांचेही सहकार्य लाभते. पोलिसांमार्फत या मंडळींच्या घरी संपर्क साधला जातो. सध्या मनोरूग्णालयात ११४ पुरूष व ७९ महिला मनोरूग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये वयस्करांची संख्या लक्षणीय आहे. संबंधित मंडळी बरी झाली तरी नातेवाईक स्वीकारण्यासाठी तयार नसल्यामुळे त्यांना मनोरूणालयाचाच आधार घ्यावा लागतो. (प्रतिनिधी)पुष्पा गायकवाड, राणी दबडे यांचे नातेवाईक न्यायालयीन आदेशानुसार दोघींना नेण्यासाठी आले होते. मात्र, घरी नेण्यासाठी ते फारसे उत्सुक नसल्याचे दिसून आले. वास्तविक या महिला बऱ्या झाल्या असून, स्वत:चे काम स्वत: करतात. त्यांना घर आठवते, नातेवाईक आठवतात. मात्र, प्रतिष्ठेपायी नातेवाईक त्यांना नाकारतात, ही शोकांतिका म्हणावी लागेल.