शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
4
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
5
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
6
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
7
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
8
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
9
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
10
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
11
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
12
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
13
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
14
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
15
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
16
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
17
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
18
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
19
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
20
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होणार होलिकोत्सव साजरा, काही गावात पोलिस प्रशासनाने घातले निर्बंध 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 22, 2024 5:08 PM

जिल्ह्यात होळी उत्सवाची धूम सुरू होणार असून बंदी घातलेल्या गावात पोलिस बंदोबस्त तैनात

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात होळी उत्सवाला रविवार २४ मार्चपासून सुरुवात होत असून जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक तर ५९८ खासगी अशा एकूण ११३६ ठिकाणी होळीचे पूजन होणार आहे. काही गावात मानपानावरून वाद असल्याने अशा गावात पोलिस प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, होलिकोत्सव शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीचा होळी उत्सव २४ मार्चपासून सुरू होत असून काही गावात पाच दिवस, सात दिवस, तर त्यापेक्षाही अधिक दिवस हा होळी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी जिल्ह्यात ५३८ ठिकाणी सार्वजनिक तर ५९८ ठिकाणी खासगी अशा एकूण ११३६ ठिकाणी होळीचे सालाबाद प्रमाणे पूजन केले जाणार आहे.

काही गावात मानपानावरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी प्रशासनाने (निर्बंध) बंदी घातली आहे. तसेच ज्या गावात वाद आहेत अशा गावांत वाद मिटविण्याच्या दृष्टीने पोलिस आणि महसूल प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. २४ मार्चपासून सुरू होणारा हा उत्सव चांगल्या उत्साही वातावरणात साजरा व्हावा. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये मानपानावरून वाद आहेत. त्यामुळे येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्या गावात होळी उत्सवास तूर्तास निर्बंध घालण्यात आले आहेत. तहसीलदार स्तरावर हे वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असून त्यातील काही गावांमध्ये वाद मिटण्याची शक्यता आहे. असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.यावर्षी सिंधुदुर्गात होळी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होऊ लागले असून यावर्षीचा होळी उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. सिंधुदुर्गात गावागावांतील रोंबाट, रंगपंचमी आणि वेगवेगळ्या वेशभूषेतील नाच गाणी (खेळ) येथील वेगळेच आकर्षण असते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने होळी उत्सव शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

५३८ ठिकाणी सार्वजनिक होळीचे पूजनजिल्ह्यात सार्वजनिक होळ्यांमध्ये दोडामार्ग ५२, बांदा २६, सावंतवाडी ४०, वेंगुर्ला २७, निवती १२, कुडाळ ९१, सिंधुदुर्गनगरी ९, मालवण ५९, आचरा २१, कणकवली ६७, देवगड ६७, विजयदुर्ग २५, वैभववाडी ३८, अशा ५३८ ठिकाणी सार्वजनिक होळीचे पूजन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी उत्सवाची धूम सुरू होणार असून बंदी घातलेल्या गावात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवून उत्सव शांततेत पार पडण्याचे पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गHoliहोळी 2024konkanकोकण