कोनाळकरवाडीत रस्त्याला भगदाड

By Admin | Updated: August 8, 2014 00:41 IST2014-08-07T21:37:31+5:302014-08-08T00:41:12+5:30

आंबेलीतील स्थिती : मोरीचे बांधकाम खचले

A hole in the road in Konarkarwadi | कोनाळकरवाडीत रस्त्याला भगदाड

कोनाळकरवाडीत रस्त्याला भगदाड

कसई दोडामार्ग : दोडामार्ग भेडशी मुख्य रस्त्यावरील आंबेली कोनाळकरवाडी याठिकाणी असलेल्या मोरीचे बांधकाम खचले आहे. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध भगदाड पडले आहे. त्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.
गेल्यावर्षी पावसाळ्यात आंबेली कोनाळकरवाडी येथील रस्त्याचे बांधकाम खचले होते. त्यावेळी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा खड्डा माती व दगडाच्या सहाय्याने भरला होता आणि यावर्षी त्याच रस्त्यावरील त्याच मोरीला भगदाड पडले आहे. दरवर्षी याचठिकाणी रस्ता खचत असल्याने वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. सदर मोरीचे बांधकाम नवीन करण्यात यावे, अशी मागणी वाहनचालकांमधून जोर धरत आहे. (वार्ताहर)

Web Title: A hole in the road in Konarkarwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.