शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

महावितरण कार्यालयावर धडक, जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 19:38 IST

mahavitran, kudal, bjp, sindhudurgnews कोरोना काळातील वीजबिल तसेच वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी भाजपाने येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले. यामुळे पदाधिकारी व पोलीस यांच्यात झटापट झाल्याने वातावरण काही काळ तंग बनले. यावेळी आंदोलनकर्त्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्दे महावितरण कार्यालयावर धडक, जोरदार घोषणाबाजीकुडाळात पोलीस, भाजप पदाधिकाऱ्यांत झटापट

कुडाळ : कोरोना काळातील वीजबिल तसेच वाढीव वीजबिल माफ करण्याच्या मागणीसाठी भाजपाने येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले. यामुळे पदाधिकारी व पोलीस यांच्यात झटापट झाल्याने वातावरण काही काळ तंग बनले. यावेळी आंदोलनकर्त्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी दिवाळीपूर्वी घोषणा केली की, दिवाळीपर्यंत वीज बिल माफ होईल. पण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी निर्णय दिला की वीज बिल माफी महावितरणला देणे शक्य होणार नाही. त्यांच्या या निर्णयाच्या विरोधात व वीजबिल माफीची मागणी करण्यासाठी जिल्हा भाजपाने कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसह गुरुवारी महावितरण कार्यालयावर धडक देत आंदोलन केले. यावेळी सरकारच्या निर्णयाच्या निषेधार्थ वीज बिलांची होळी केली.हे आंदोलन भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा समीधा नाईक, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती नूतन आईर, नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला मोर्चा प्रमुख संध्या तेरसे, राजू राऊळ, बाळू देसाई, दीपक नारकर, भाई सावंत, राकेश कांदे, अविनाश पराडकर, अस्मिता बांदेकर, मोहन सावंत, ॲड. बंड्या मांडकुलकर, संजय वेंगुर्लेकर, किशोर मर्गज, अभय परब, गोपाळ हरमलकर, पप्या तवटे, आरती पाटील, धोंडी चिंदरकर, संदीप मेस्त्री, राजा धुरी, राजेश पडते, संदेश नाईक, स्वप्ना वारंग, सुप्रिया वालावलकर, आश्विन गावडे, सुनील बांदेकर व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी राजन तेली व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना धारेवर धरले. तेली म्हणाले, कोरोना महामारीमुळे करण्यात आलेल्या तीन ते चार महिन्यांतील लॉकडाऊनमुळे सर्व जनता या काळात घरी होती. कोणाच्याही हाताला काम नव्हते. अनेकांचे रोजगार गेले. व्यवसाय ठप्प झाले अशावेळी पैशाची आवक बंद झाल्यामुळे एकदम आलेले तीन महिन्यांचे वीज बिल भरण्याची आर्थिक ताकद बऱ्याच वीज ग्राहकांची नाही. त्यामुळे अनेक राज्यात वीज बिल माफ करण्यात आले आहे. मात्र, महाराष्ट्रात वीज बिल माफी का नाही? आता जनतेने काय करायचे? असे प्रश्न उपस्थित करीत येथील जनता वाढीव वीज बील भरणार नाही, तसेच आर्थिक संकटात सापडलेल्या जनतेकडून वीज बिल वसुलीची सक्ती करू नये, असेही ते म्हणाले.यावेळी विनोद पाटील यांनी किमान सव्वा महिना तरी कोणत्याही ग्राहकाला वीज बिलाची सक्ती करणार नाही. यानंतर प्रशासनाच्या आदेशानुसार बिल वसुली केली जाईल असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. या आंदोलना दरम्यान वीज बिलाची होळी करणाच्या प्रयत्न करणाऱ्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना रोखताना पोलीस व पदाधिकारी यांची चांगलीच झटापट झाली. त्यामुळे येथील वातावरण काही काळ तंग बनले.आंदोलन छेडल्याप्रकरणी राजन तेली, समीधा नाईक, रणजित देसाई, ओंकार तेली, संध्या तेरसे यांच्यासह ३५ जणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडण्यात आले. पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवला होता. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणBJPभाजपाkudal-acकुडाळsindhudurgसिंधुदुर्ग