शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग प्रकल्पग्रस्तांनी घेतली प्रांताधिका-यांची भेट, डिसेंबरअखेर घोळ संपवा- प्रमोद जठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2017 20:18 IST

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण होणार हे निश्चित झाले असले तरी कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या नुकसानभरपाई संदर्भात प्रशासनाने घातलेला घोळ अजूनही मार्गावर येत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त संतापले आहेत.

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण होणार हे निश्चित झाले असले तरी कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या नुकसानभरपाई संदर्भात प्रशासनाने घातलेला घोळ अजूनही मार्गावर येत नसल्यामुळे प्रकल्पग्रस्त संतापले आहेत. या संदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रकल्पग्रस्तांसमवेत प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रांताधिका-यांसमोर मांडले. डिसेंबरअखेर हा घोळ संपवा व नुकसानभरपाईचा मार्ग मोकळा करा, असे प्रमोद जठार यांनी प्रांताधिका-यांना सांगितले.महामार्ग रुंदीकरणात कणकवली शहरातील ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी, दुकाने, स्टॉल जात आहेत त्या प्रकल्पग्रस्तांनी आपले म्हणणे प्रांंताधिका-यांसमोर मांडले. जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे समाधान होणार नाही, तोपर्यंत महामार्गाचे काम मार्गी लागणार नाही, असा इशारा जठार यांनी दिला.काही प्रकल्पग्रस्तांना नोटिसा मिळालेल्या नाहीत. काहींना नोटिसा मिळाल्या आहेत, परंतु त्यात त्रुटी असल्यामुळे प्रकल्पग्रस्त नाराज आहेत. काही गाळ्यांचे भूसंपादन योग्य झाले नाही. काही स्टॉलधारकांना नोटिसाच मिळाल्या नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने आपल्या चुका डिसेंबरअखेर दुरुस्त कराव्यात, असे प्रमोद जठार यांनी सांगितले. ज्यांना नोटिसा मिळाल्या आहेत त्या प्रकल्पग्रस्तांनी आपल्या हरकती प्रांताधिका-यांकडे सुपूर्द केल्या. त्या हरकतींवर सुनावणी होऊन त्यांना नुकसानभरपाई देण्याचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन प्रमोद जठार यांनी केले. प्रकल्पग्रस्तांनी आपापल्या शंका प्रांताधिका-यांसमोर मांडल्या. नियमाप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाईल व हरकतींची सुनावणी लवकरात लवकर केली जाईल, असे प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांनी सांगितले.प्रकल्पग्रस्तांची सध्या धावपळ सुरू आहे. कोणीतरी न्याय देईल व आपले प्रश्न सरकार दरबारी मांडून योग्य ती नुकसानभरपाई मिळेल या आशेवर प्रकल्पग्रस्त आहेत. महामार्गामुळे प्रकल्पग्रस्तांच्या रोजीरोटीवर कु-हाड कोसळणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांची झोप उडाली आहे. प्रांताधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालय व दिल्ली अशी प्रकल्पग्रस्तांची फरपट सुरू आहे. जो कोणी न्याय देईल तो आमचा, अशी स्थिती प्रकल्पग्रस्तांची झाली असून न्यायासाठी सरकारी कार्यालयांचे दरवाजे झिजवत आहेत.स्टॉलधारकांना न्याय द्यास्टॉलधारकांना अजूनही नोटिसा न मिळाल्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळणार नाही. त्यामुळे जमीन, दुकाने, गाळे, भाडेकरू, जमीनमालक अशी वर्गवारी करून त्यांचे प्रश्न डिसेंबरअखेर मार्गी लावण्याचे आवाहन प्रमोद जठार यांनी केले. प्रकल्पग्रस्तांनी प्रांताधिकारी कार्यालयात गर्दी केली होती. कार्यालयात उभे रहायलाही जागा नव्हती. सर्व प्रकल्पग्रस्तांनी आपले गा-हाणे प्रांताधिका-यांसमोर मांडले. प्रशासनाचा घोळ संपत नाही, तोपर्यंत मंत्रालयातही नुकसानभरपाईचे काम मार्गी लागत नाही व जोपर्यंत योग्य ती नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत महामार्गाचे काम होणार नाही, असा इशारा प्रमोद जठार यांनी दिला. त्यामुळे लवकरात लवकर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवा, असे आवाहन प्रमोद जठार यांनी केले.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारBJPभाजपा