शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

आधी नुकसान भरपाई द्या, कणकवलीतील महामार्ग उड्डाणपूल दुरूस्तीचे काम पाडले बंद

By सुधीर राणे | Updated: December 23, 2022 17:14 IST

महामार्ग ठेकेदाराच्या चुकीमुळे टेंबवाडी येथील एका नागरिकाचा मृत्यू

कणकवली: कणकवली शहरात  सुरू करण्यात आलेले महामार्ग उड्डाणपूल दुरूस्तीचे काम भाजपा नगरसेवक शिशिर परुळेकर, सामाजिक कार्यकर्ते महेश सावंत यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी बंद पाडले. महामार्ग ठेकेदाराच्या चुकीमुळे टेंबवाडी येथील एका नागरिकाचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना आधी नुकसान भरपाई द्या, नंतरच उड्डाणपूल दुरूस्तीचे काम सुरू करा असे परुळेकर, सावंत यांनी ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना सुनावले.शहरातील एस.एम. हायस्कूल या दरम्यान खचलेल्या उड्डाणपूल रस्त्याच्या दुरूस्तीचे काम शुक्रवारी सकाळी ११ पासून सुरू करण्यात आले होते. मात्र नगरसेवक  परुळेकर, महेश सावंत, सागर राणे आदींनी तेथे जाऊन काम बंद पाडले. चार महिन्यापूर्वी शहरातील टेंबवाडी येथील एक नागरिक पदपथावरून चालत होते. पदपथालगत असलेल्या विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. महामार्ग ठेकेदाराच्या चुकीमुळे शहरातील नागरिकाला प्राण गमवावा लागला. मृताच्या नातेवाईकांना ठेकेदाराकडून भरपाई मिळायला हवी होती. मात्र ठेकेदाराने भरपाई देण्याबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे आधी नुकसान भरपाई द्या,त्यानंतरच दुरूस्तीचे काम सुरू करा असे परुळेकर आणि सावंत यांनी ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना सुनावले. सुमारे अर्धा तास महामार्ग ठेकेदार कंपनीचे उदयवीर सिंग तसेच इतर अधिकारी आणि नगरसेवक परुळेकर यांच्यात भरपाईबाबत चर्चा सुरू होती. मात्र भरपाई देण्याबाबत ठोस तोडगा निघाला नाही. त्यामुळे जोपर्यंत नुकसान भरपाई दिली जात नाही तोवर उड्डाणपूल दुरुस्तीचे काम सुरू करू दिले जाणार नाही असा इशारा  परुळेकर यांनी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग