शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील वीस वर्षांतील उच्चांकी पाऊस मे महिन्यात बरसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:50 IST

शेतकऱ्यांकडून भात पेरणी सुरू, अवकाळीमुळे मोठे नुकसान

गिरीश परबसिंधुदुर्गनगरी : पावसाळी हंगाम सुरू होण्याच्या अगोदरच अवकाळी पावसाने जिल्ह्यात हाहाकार माजवला. मे महिन्यात तब्बल ५४१ मिमीच्या सरासरी जिल्ह्यात पाऊस झाला. पावसासोबतच जोरदार वादळवारे झाल्याने शंभरपेक्षा जास्त घरे, गोठ्यांची पडझड होऊन ३७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दोघांचा यादरम्यान मृत्यू झाला आहे.

गत २० वर्षांत असा अवकाळी पाऊस झाला नसल्याची नोंद प्रशासन दप्तरी आहे. दरम्यान जून महिन्यात अधूनमधून एखाद दुसरी पावसाची सर सोडली तर ठिकठिकाणी कडकडीत ऊन पडल्याचे पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे.

दरवर्षी मे महिन्यात एक ते दोन दिवस किंवा महिन्याअखेर अवकाळी पाऊस पडतो. परंतु या वर्षी मात्र १२ मेपासूनच अवकाळी पावसाला सुरुवात झाली. १९ मेपर्यंत पावसाला तितकासा जोर नव्हता. २० ते २९ मी या कालावधीत पावसाने राखले व मोठ्या स्वरूपाचा पाऊस झाला. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांना शेतीची मशागतपूर्व कामेसुद्धा करता आली नाही.

३० मेनंतर ते आतापर्यंत पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली आहे. एखाद दुसरी पावसाची सर सोडली तर दिवसभर कडकडीत ऊन पडलेले पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्याने अवकाळी पडलेल्या पावसाच्या जोरावर भारतीय केले आहेत. अधूनमधून पडत असलेल्या पावसामुळे पेरलेल्या भाताला अंकुर आले आहेत.

पावसाच्या आगमनाचा खरा हर्ष उल्हास हा मुघल नक्षत्रपासून सर्वत्र साजरा केला जातो. साधारण ७ जून मृग नक्षत्राला सुरुवात होते. याला मिरग देखील म्हटले जाते. परंतु मान्सूनचा अद्याप पत्ता नाहीये. मृग कोरडा जातोय की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावू लागला आहे.

१९ दिवसांत ३५ लाखांचे नुकसान; २ मृत्यू, १०० घरांची पडझडमे महिन्यात गेल्या दहा वर्षांत कधी नव्हे एवढा पाऊस या १९ दिवसांत झाला आहे. १०२ गावे यामुळे बाधित झाली आहेत. कणकवली व कुडाळ येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. १०० घरे व १० गोठ्यांची पडझड होऊन ३५ लाखांचे नुकसान आहे. २ जनावरे दगावून त्यांचे १ लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

गेल्या २० वर्षांत झालेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)२००५ - ३५.५२००६ - ३४४.१२००७ - ५२.१२००८ - २२.२२००९ - १५.८२०१० - १३.८२०११ - ०२०१२ - ०२०१३ - ०२०१४ - ३.८२०१५ - २३२०१६ - ४२०१७ - ७२.६२०१८ - ३०.७२०१९ - ०२०२० - ७२०२१ - ३११२०२२ - ३१.३२०२३ - ३.१२०२४ - ५१.८२०२५- ५४१

७४ गावातील शेतकऱ्यांचे ४० हेक्टरचे नुकसानकाजू, आंबा बागायतदार शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले. ७४ गावातील १७५ शेतकऱ्यांचे ४० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाल्याचे पंचनामाच्या माध्यमातून समोर आले आहे. जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय पंचनामाच्या सूचना केल्यानंतर तालुका कृषी कर्मचाऱ्यांकडून ही कार्यवाही करण्यात आली होती.

मे महिन्यात झालेला पाऊसदेवगड ५७९.५ मिमी, मालवण ४५२.९ मिमी, सावंतवाडी ६६४.६ मिमी, वेंगुर्ला ६६८.४ मिमी, कणकवली ५८६.५ मिमी, कुडाळ ५६२.१ मिमी, वैभववाडी ५२९ मिमी, दोडामार्ग ४९४ मिमी

पाण्याच्या पातळीत मोठी वाढयंदा मे महिन्यात पाणीटंचाईची तीव्रता जाणवली नाही. त्याला कारण म्हणजे अवकाळी झालेला पाऊस. सध्या धरणातील, ओढा, तलाव व नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दोन धरणांमधील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरीfarmingशेती