शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकातील हायस्पीड नौका ताब्यात, आरवली येथे सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 15:14 IST

मालवण : कर्नाटक किनारपट्टीवरील हायस्पीड नौकांच्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील घुसखोरी व मासळी लुटीबाबत आमदार नीलेश राणे यांनी सातत्याने आक्रमक भूमिका ...

मालवण : कर्नाटक किनारपट्टीवरील हायस्पीड नौकांच्या सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील घुसखोरी व मासळी लुटीबाबत आमदार नीलेश राणे यांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली, तर मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिपदाचा पदभार घेतल्यानंतर मत्स्य विभागाची धडक कारवाई अधिकच गतिमानपणे सुरू झाली. सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने धडक कारवाई करत कर्नाटक येथील हायस्पीड नौका ताब्यात घेतली आहे.आरवली वेंगुर्ला समोर १६ वाव समुद्री क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर सहायक मत्स्य विकास अधिकारी परवाना अधिकारी वेंगुर्ला यांनी २८ जानेवारी रोजी नियमित गस्त घालत होते. त्यावेळी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली जलशिला सुवर्णा कोटियान (रा. कोदावूर ता. मलपे, राज्य कर्नाटक) यांची नौका हनुमा सानिध्य नों. क्र.- IND - KA- २-MM-५२१७ द्वारे महाराष्ट्रातील जलधीक्षेत्रात आरवली वेंगुर्ला समोर अनधिकृतरित्या मासेमारी करत असताना, दिसून आली. त्या नौकेला मत्स्य विभागाने ताब्यात घेतले. नौकेवर नौका तांडेलसह इतर खलाशी होते.ही नौका जप्त करून वेंगुर्ला बंदरात ठेवण्यात आली आहे आणि त्यावर असणाऱ्या मासळीचा लिलाव करण्याची कार्यवाही करण्यात आली. अंमलबजावणी अधिकारी मुरारी भालेकर, सहायक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी वेंगुर्ला) यांनी पोलिस कर्मचारी आळवेकर, तसेच दीपेश मायबा, मिमोह जाधव व सागरी सुरक्षा पर्यवेक्षक सागर परब व राजेश कुबल, स्वप्निल सावजी, नीलेश पाणजी, प्रणित मुणगेकर, हर्षद टाक्कर, भगवान तांडेल, चंद्रकांत कुबल, सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात केली.प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणीअंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर या नौकेबाबत सुनावणी सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFishermanमच्छीमार