शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला, बहुतांश धरणे ओव्हर फ्लो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 16:19 IST

महत्त्वाच्या नद्यांच्या पाणी पातळीत आता हळूहळू घट होत असल्याने पूरस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली आहे.

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील पावसाचा जोर आता पूर्णपणे ओसरला आहे. गेल्या २४ तासात वेंगुर्ला तालुक्यात सर्वाधिक ६७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ४४ मिमी पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी १६७४.४ मिमी पाऊस झाला आहे.जून महिन्यात सरासरीने पिछाडलेल्या पावसाने जुलै महिन्याच्या पंधरवड्यात गतवर्षीची सरासरी मागे टाकून पुढे वाटचाल सुरू केली आहे. गेले आठवडाभर पडत असलेल्या संततधार पावसाने आता काही विश्रांती घेतली असली तरी असा पडणारा पाऊस शेतीसाठी उपयुक्त ठरणारा असल्याने बळीराजांमधून समाधान व्यक्त होत आहे.तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून, सर्व आकडे मिलिमीटर परिमाणात आहेत. देवगड- २१.४ (१३९१.८), मालवण- ४७.६ (१५८७.२), सावंतवाडी- ४९.९ (१९९९.४), वेंगुर्ला- ६७.८ (१७३५.५), कणकवली- ४२.४ (१५२८.४), कुडाळ- ४०.२ (१८०१.२), वैभववाडी- ४६.९ (१७०६.६), दोडामार्ग- ४९.(१९०९.८) असा पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. तर महत्त्वाच्या नद्यांच्या पाणी पातळीत आता हळूहळू घट होत असल्याने पूरस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आली आहे. सध्या कुठल्या नदीतील पाणी पातळी धोक्याच्या इशाऱ्यावर नाही.

तिलारी धरणात ६ हजार ४० क्युसेक पाण्याचा विसर्गतिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत ६५.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये ३७७.२४६ दलघमी पाणीसाठा असून, धरण ८४.३३ टक्के भरले आहे. सध्या हा धरणातून एकूण ६ हजार ४० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस