शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पहिला पाऊस... आंबोलीत पावसाची जोरदार हजेरी, पर्यटक सुखावले, हवेत गारवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 21:23 IST

वीस मिनिटे बरसला : पर्यटक सुखावले, हवेत गारवा

आंबोली (सिंधुदुर्ग) : गेले पंचवीस दिवस महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्गातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीमध्ये रोज सकाळी व रात्री धुके पडत आहेत. त्यात भर म्हणून बुधवारी सायंकाळी सात वाजता जवळपास वीस मिनिटे धो-धो पाऊस कोसळला. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तर उन्हाळी पर्यटनासाठी आंबोलीत असलेल्या पर्यटकांना सुखद धक्काच बसला.

ऐन गरमीच्या हंगामात कोसळणाऱ्या संततधार पावसाची मजा पर्यटकांनी लुटली; मात्र या अवकाळी पावसाने जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात असलेला आंबा हंगाम अडचणीत येणार आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सूर्यदर्शन फार कमी झाले आहे. हवेेतील उष्णतेचे प्रमाण कमालीचे वाढले होते. अंगाची लाहीलाही होत असताना आता अवकाळी पाऊस बरसण्याची चिन्हे होती. दरम्यान, कणकवलीसह जिल्ह्यात सायंकाळी पावसाने हजेरी लावली.

दरवर्षी मे महिन्यात पाऊस

दाट धुके, धो-धो पाऊस पर्यटकांची धम्माल मस्ती चोहोबाजूने दाट धुके आणि धो-धो पाऊस यामुळे या मार्गावरून ये-जा करणारे पर्यटक सुखावले होते. धुके आणि पावसाचा खेळ पाहण्यासाठी घाटामध्ये पर्यटक थांबून या पावसाचा आनंद घेत होते. आंबोलीमध्ये दरवर्षी मे महिन्यात पावसाची हजेरी लागते. त्याच पद्धतीने याहीवर्षी हजेरी लागली आहे. हा पाऊस आणखी काही दिवस पडेल असे जाणकारांचे मत असून जूनच्या दहा तारखेपासून खऱ्या अर्थाने आंबोलीचा पाऊस सुरू होणार आहे. 

टॅग्स :Rainपाऊसthaneठाणेsindhudurgसिंधुदुर्ग