शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

मुसळधार पावसामुळे मडुरा पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 19:32 IST

Banda Rain Sindhudurg : मडुरा पंचक्रोशीतील गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी नदी, ओहोळ यांचे पाणी पात्र ओलांडून शेतात घुसले अन शेत जमिनीला नदीचे स्वरूप आले आहे. दरम्यान सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती.

ठळक मुद्देमाडाचेगावळ पुलावर पाणी मुसळधार पावसामुळे मडुरा पंचक्रोशीतील जनजीवन विस्कळीत

बांदा :मडुरा पंचक्रोशीतील गेले दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बहुतांश पूल, कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. काही ठिकाणी नदी, ओहोळ यांचे पाणी पात्र ओलांडून शेतात घुसले अन शेत जमिनीला नदीचे स्वरूप आले आहे. दरम्यान सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती.मडुरा पंचक्रोशीसह सावंतवाडी तालुक्यात मुसळधार पावसाचा जोर कायम होता. या पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. शेर्ले कापई पूल पाण्याखाली गेले होते. तर मडुरा सातोसे मार्गावरील मडुरा माऊली मंदिर पुलावर पाणी आल्याने पंचक्रोशीतील चार गावांचा संपर्क तुटला. पाडलोस माडाचेगावळ येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाडीचा गावाशी संपर्क तुटला होता.|बांदा शिरोडा मार्गावरील न्हावेली रेवटेवाडी पुलावर पाणी आल्याने काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. मडुरा हनुमान मंदिर जवळील पुलही पाण्याखाली गेले होते. मडुरा-पाडलोस सीमेवर सुरू असलेल्या कालव्याचा भरावही कोसळला. दांडेलीतील पुलावर पाणी आल्याने आरोस-दांडेली-न्हावेली मार्गे सावंतवाडी मार्ग वाहतुकीस काही काळ बंद झाला. ठिकठिकाणची केलेली भात पेरणी पाण्याखाली जाऊन कुजण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतेत सापडला आहे. धो धो कोसळणार्‍या पावसामुळे सर्व रस्त्यावर वाहनांची वर्दळ मात्र कमी होती. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग