शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: अतिवृष्टीचा फटका, धामापूर-मोगरणे येथे घरावर दरड कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 17:28 IST

चौके : सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका मालवण तालुक्यातील धामापूर गावाला बसला. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास धामापूर, मोगरणे-जाधववाडी ...

चौके : सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीचा फटका मालवण तालुक्यातील धामापूर गावाला बसला. गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास धामापूर, मोगरणे-जाधववाडी येथील  जयंत सदानंद ठोंबरे यांच्या राहत्या घरावर दरड कोसळून घराच्या मागील पडवीच्या भिंती आणि कौलारू छप्पर पूर्णपणे कोसळले. यात ठोंबरे यांचे सुमारे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.दरम्यान, ज्यावेळी दरड कोसळून घराच्या भिंती आणि छप्पर कोसळले त्यावेळी त्या पडवीमध्ये ठोंबरे यांची गाय बांधलेली होती. सुदैवाने या दुर्घटनेत गायीचा जीव वाचला. मात्र तिला गंभीर दुखापत झाली आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच धामापूर सरपंच मानसी परब आणि महेश परब यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच या दुर्घटनेची माहिती दूरध्वनीवरून शिंदेसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि आमदार नीलेश राणे यांना दिली.यावर दत्ता सामंत यांनी तातडीने पंचनामा करण्याची सूचना केली असून आमदार नीलेश राणे यांनी लवकरात लवकर ठोंबरे यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ, असे आश्वासन सरपंच  मानसी परब यांना दिले, अशी माहिती महेश परब यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसlandslidesभूस्खलन