वैभववाडी : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.रविवारी रात्रभर संततधार सुरु होती.. घाट परिसरात अतिवृष्टी सुरु आहे. याचा फटका करुळ घाटरस्त्याला बसला आहे. करुळ घाटाच्या मध्यावर रस्त्याची मोरी खचली असून लगतचा रस्ताही खचण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी रस्ता खचलाय तेथून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे.दरम्यान, रस्त्यालगत भगदाड पडल्याचे समजताच पोलीस निरीक्षक अतुल जाधव, हवालदार राजू जामसंडेकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर तेथून एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना खचलेल्या ठिकाणी तातडीने बोलावून घेतले. बांधकामचे कर्मचारी घाटरस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्यात गुतले आहेत. मात्र तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्या पावसामुळे घाटरस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती धोकादायक ठरणार आहे. खचलेल्या रस्त्याचा काही भाग खचण्याची शक्यता असल्यामुळे पावसात काम करणे शक्य होणार नाही. पाऊस जर असाच आणखी तीन चार दिवस कायम राहील्यास हा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षिपणाचा परिणामकरुळ घाटरस्त्याच्या दरडींच्या बाजूला पक्की गटारे बांधण्यात आलेली आहेत. परंतु, पावसाळा सुरु होण्यापूर्वी या गटारात पडलेली दगडमातीचा गाळ काढणे आवश्यक होते. तो न काढल्यामुळे डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा निचरा होत नाही. ते पाणी रस्त्यावरुन वाहत असल्यामुळे रस्त्याला भगदाड पडणे, रस्ता खचणे असे प्रकार घडत असतात. ही बाब पावसाळ्याच्या प्रारंभीच ह्यलोकमतह्णने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. परंतु प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे या घटनेतून दिसून येत आहे.करुळ घाटमार्गाची देखभाल करणार कोण?तळेरे-कोल्हापूर हा आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ जी झाला आहे. पूर्वी हा राज्यमार्ग होता. त्यावेळी त्याची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग करीत होते. आता हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणकडे गेल्यामुळे त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी महामार्ग प्रधिकरणकडे आहे. परंतु, या महामार्ग प्रधिकरणाचे कार्यालयात करुळ घाटापासून ५८ किलोमीटरवर कोल्हापूरात आहे. त्यामुळे रस्त्यासह घाटमार्गाची आपत्कालीन देखभाल कोण करणार हा प्रश्नच आहे.
अतिवृष्टीने करुळ घाटात रस्ता खचला, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 18:39 IST
Rain In Konkan Sindhudurg : दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील करुळ घाटातील रस्त्याचा काही भाग सोमवारी (ता.१२) खचला. त्यामुळे या मार्गावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पोलिसांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन तात्पुरती डागडुजी केली आहे.
अतिवृष्टीने करुळ घाटात रस्ता खचला, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सुस्त
ठळक मुद्देपोलीस, बांधकामकडून तात्पुरती डागडुजी एकेरी वाहतूक सुरु