शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वैभववाडीत मुसळधार पाऊस, नाधवडेत झाड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 11:17 IST

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, दुपारनंतर मुसळधार पडणाऱ्या पावसाचा वैभववाडीच्या आठवडा बाजाराला चांगलाच फटका बसला. बाजारातील भाजी, कापड, व शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचे या पावसामुळे नुकसान झाले.या पावसाचा घाटमार्गांवर परिणाम झालेला नाही. मात्र, नाधवडे धरणानजीक झाड कोसळल्याने सायंकाळी वैभववाडी-तळेरे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

ठळक मुद्देवैभववाडीत मुसळधार पाऊस, नाधवडेत झाड कोसळलेआठवडा बाजारातील व्यापाऱ्यांना फटका; घाटमार्ग सुरळीत

वैभववाडी : आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. मात्र, दुपारनंतर मुसळधार पडणाऱ्या पावसाचा वैभववाडीच्या आठवडा बाजाराला चांगलाच फटका बसला. बाजारातील भाजी, कापड, व शैक्षणिक साहित्य विक्रेत्यांचे या पावसामुळे नुकसान झाले.या पावसाचा घाटमार्गांवर परिणाम झालेला नाही. मात्र, नाधवडे धरणानजीक झाड कोसळल्याने सायंकाळी वैभववाडी-तळेरे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.मृग नक्षत्र सुरू झाल्यावर २ ते ३ दिवसांनी समाधानकारक पाऊस झाल्याने भात पेरणी उरकण्यात आली. परंतु, पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता वाढली होती. पेरणी होऊन आठवडा मागे पडला तरी पाऊस परतला नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवते की काय? अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.मात्र, मंगळवारी सायंकाळी हा पाऊस परतला. परंतु, त्यामध्ये जोर नव्हता. बुधवारी सकाळी पाऊस जोर धरण्याची चिन्हे दिसत होती. त्याप्रमाणे सकाळच्या सत्रात २ ते ३ मोठ्या सरी कोसळल्या. दुपारी तीननंतर मुसळधार पावसाला सुरुवात होताच आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावरील पावसाचे पाणी काही प्रमाणात दुकानांमध्ये घुसल्यामुळे भाजी, कपडे व्यापाऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले.जिल्ह्यात सरासरी ११.३७ मिलीमीटर पाऊससिंधुदुर्गात गेल्या चोवीस तासात सरासरी ११.३७ मिलीमीटर पाऊस झाला. तालुकानिहाय सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात झालेला पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी आतापर्यंत झालेल्या एकूण सरासरी पावसाची आहे. दोडामार्ग ३४ (१९७), सावंतवाडी ०३ (११८), वेंगुर्ले ०१ (१३२), कुडाळ ०९ (१९४), मालवण ०१ (१३३), कणकवली २३ (२०२), देवगड ०३ (१२५), वैभववाडी १७ (१८२) पाऊस झाला आहे.विजांचा कडकडाटपावसादरम्यान विजांचा कडकडाटही सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यामुळे बहुतांश नद्या-नाले रात्रीपर्यंत प्रवाहित होण्याची शक्यता आहे. करूळ आणि भुईबावडा दोन्ही घाटमार्ग सुरळीत होते. मात्र, नाधवडे धरणानजीक झाड कोसळल्याने वैभववाडी-तळेरे मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वेळाने एकेरी वाहतूक सुरू केली. त्यानंतर रस्त्यावरील झाड हटविण्याचे काम सुरू होते. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग