शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Sawantwadi Rain: सावंतवाडीत मुसळधार; नदी-नाल्यांना पूर आल्यानं वाहतूक ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:07 IST

Sawantwadi Flood: सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरात गेले तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच परिसर जलमय झाला आहे.

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यासह जिल्हाभरात गेले तीन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वच परिसर जलमय झाला आहे. सावंतवाडी तालुक्यातील बांदा-तळवडे-ओटवणे-कोळगाव-मळगाव-मळेवाड-आरोंदा येथील सखल भागात असलेले अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून, वीजवाहिनी तुटल्याने सावंतवाडी तालुक्यातील बत्ती गुल झाली आहे.सावंतवाडी तालुक्यात गेले तीन दिवस धो धो कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. नदी-नाले, ओढे यांना पूर आल्यामुळे अनेकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याने विद्यार्थीही घरीच थांबले आहेत. पूरस्थिती निर्माण झाल्याने भात शेती पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत.मळगाव रेडकरवाडी येथे वामन राणे यांच्या शेतमांगरावर सांगवानचे झाड कोसळले. यावेळी या शेतमांगरात गुरे बांधली होती. मात्र सुदैवाने लगत असलेल्या आंब्याच्या झाडाला विराट अडकल्याने मोठी हानी टळली. रेडकर वाडीतील विजय हरमलकर यांच्या घरालगत असलेले सांगावयाचे मोठे झाडही उन्मळून पडले. मात्र हे झाडही दोन घरांच्या मधोमध पडल्याने मोठी नुकसानी टळली. ब्राह्मणपाट येथे स्ट्रीट लाईटच्या विद्युत वाहिनीवर झाड पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. गेले चार दिवस सलग वेगवेगळ्या ठिकाणी झाडे पडल्यामुळे या परिसरातील बत्ती गुल झाली आहे.सावंतवाडी वेंगुर्ले राज्य मार्गावरील होडावडा नदीला पूर आल्यामुळे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे. तळवडे बाजारपेठेतही  पाणी शिरले असून, आरोंदा येथहीे परिसर जलमय झाला आहे. कोलगाव येथे ही नदी दुथडी भरून वाद असल्यामुळे संपर्क तुटला आहे. बांदा परिसरातही तेरेखोल नदीला पूर आल्यामुळे पाणीच पाणी झाले असून शेर्लेतील चार घरांना पाण्याने वेढा घातला आहे. यातील चार कुटुंबे पाण्यात अडकले असून मदतकार्य सुरू आहे.

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीfloodपूरKonkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग