शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: दोडामार्गात मुसळधार, पणतुर्लीत सार्वजनिक विहीर कोसळल्याने पाणीटंचाई

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 30, 2023 18:06 IST

दोडामार्ग : गणेशोत्सवाच्या मागच्या काही दिवसांत रिमझिम बरसणाऱ्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दोडामार्ग ...

दोडामार्ग : गणेशोत्सवाच्या मागच्या काही दिवसांत रिमझिम बरसणाऱ्या पावसाने चांगलाच जोर धरला आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर धुवाधार कोसळणाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्याला चांगलेच झोडपून काढले. परिणामी पणतूर्ली येथील सार्वजनिक विहीर या संततधार पावसात कोसळली. पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.गणेशोत्सवाच्या काळात तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र जोर नव्हता त्यामुळे भातशेतीला पुरेसा पाऊस नसल्याने शेतकरी मात्र चिंतेत होता. काही ठिकाणी तर चक्क बाप्पालाच समाधानकारक पाऊस होऊ दे म्हणून साकडे घालण्यात आले होते. अखेर बाप्पाने शेतकऱ्यांवर कृपादृष्टी केली असून तालुक्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे.शुक्रवारी मध्यरात्रीनंतर तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. तळेखोल - विर्डी परिसरात वादळी वाराही झाला. या धुव्वाधार पावसाचा फटका पणतूर्ली येथील सार्वजनिक विहिरीला बसला. शनिवारी पहाटेच्या सुमारास गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असलेली सार्वजनिक विहीर कोसळली. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली असून गावकऱ्यांना कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सुदैवाने विहीर पहाटेच्या सुमारास कोसळली अन्यथा दिवसा दुर्घटना घडली असती तर मोठा अनर्थ घडला असता.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसWaterपाणी