शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; ६३ नागरिकांचे स्थलांतर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 20, 2024 19:05 IST

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक पाऊस

गिरीश परबसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठवड्याभराच्या कालावधीनंतरही मुसळधार पावसाचे सत्र कायम आहे. ग्रामीण भागातील पुलांवर पाणी आल्याने विविध रस्ते बंद झाले होते. परिणामी, अनेक राज्ये, तसेच जिल्हा मार्गावरील वाहतूक अधूनमधून ठप्प होत आहे. मुसळधार पावसामुळे आणि खचत असलेल्या डोंगर भागापासून सद्यस्थितीत जिल्ह्यात १३ कुटुंबांतील ६३ नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत ५२.७ च्या सरासरीने पाऊस झाला असून, सर्वाधिक ८२.२ मिलीमीटर पाऊस दोडामार्ग तालुक्यात झाला आहे.गेल्या आठवड्याभरापासून हवामान खात्याच्या अलर्टनुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून तो अद्यापही कायम आहे. सह्याद्री पट्ट्यात मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख पाच नद्यांना पूरस्थितीचे स्वरूप प्राप्त झाले होते. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांवर अधून मधून पाणी येत असल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती.

२४ तासांत झालेला पाऊसशनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यात ५२.७ च्या सरासरीने पाऊस झाला. यामध्ये देवगड तालुक्यात ५३ मिलीमीटर पाऊस, मालवणमध्ये ३४.४ सावंतवाडीमध्ये ६६.८, वेंगुर्ला मध्ये ५४.१ मिलीमीटर, कणकवलीमध्ये सर्वाधिक ४६.८ मिलिमीटर पाऊस झाला, कुडाळमध्ये ५३.३ मिलीमीटर पाऊस, वैभववाडीमध्ये ५०.८, तर दोडामार्गमध्ये ८२.२ मिलीमीटर पाऊस झाला.

आजपर्यंत झालेले नुकसानसिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत प्रत्येकी ३ सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पक्की घरे १७, कच्ची घरे ३ पूर्णतः नुकसान झाले असून, ४०८ पक्क्या घरांचे, २०० कच्चा घरांचे, गोठा ११, पोल्ट्री १, २८ मांगरांचे अंशतः नुकसान झाले आहे. १४ दुधाळ जनावरे, १ ओढकाम करणारे जनावर आणि ३,१९५ कोंबड्या पुराच्या पाण्यामुळे मृत झाल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस