शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
4
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
5
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
6
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
7
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
8
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
10
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
11
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
12
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
13
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
14
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
15
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
16
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
17
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
18
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
19
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
20
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सुविधाप्रश्नी न्यायालयीन लढा देणार

By admin | Updated: August 24, 2014 22:34 IST

विरेंद्र नेवे : सावंतवाडीतील कार्यक्रमात प्रतिपादन

सावंतवाडी : उच्च न्यायालयातील न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून कोकणातील जनतेचा सार्वजनिक आरोग्य सुविधांचा प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन अ‍ॅड. विरेंद्र नेवे यांनी अभिनव गौरव पुरस्कार स्वीकारताना केले.सिंधुुदुर्गातील ट्रामा केअर युनिट व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रश्नावर अभिनव फाऊंडेशनमार्फत मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक जाणीवेतून जनहित याचिका दाखल करत न्यायालयीन लढा दिल्याबद्दल अ‍ॅड. नेवे व त्यांच्या पत्नी अ‍ॅड. अमृता पाटील यांचा नुकताच अभिनव गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सावंतवाडीतील भाजी विक्रेते सुभाष माणगावकर यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन अ‍ॅड. नेवे व अ‍ॅड. पाटील यांना गौरविण्यात आले. अभिनव गं्रथालयाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित या सत्कार समारंभास भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन श्रीपाद चोडणकर, पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्ञानदेव नावलकर, प्रा. विजय फातर्पेकर, अभिमन्यू लोंढे, अभिनव फाऊंडेशनचे डॉ. प्रसाद नार्वेकर, सहसचिव अ‍ॅड. शशांक मराठे आदी उपस्थित होते. यावेळी अभिनव फाऊंडेशनच्या बँकींग मार्गदर्शन वर्गातून बँकींग परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनघा कुमठेकर यांचा प्रा. फातर्पेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिकाटीने अभ्यास केल्यास यशस्वी होता येईल, असे कुमठेकर म्हणाल्या. परिचय आेंकार तुळसुलकर, प्रास्ताविक डॉ. प्रसाद नार्वेकर, स्वागत जितेंद मोरजकर, सूत्रसंचालन अ‍ॅड. मराठे, आभार संस्था सचिव अण्णा म्हापसेकर यांनी मानले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, पेंशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनंत ओटवणेकर, सचिव एम. एम. राजगुरू, अ‍ॅड. गौतम गव्हाणकर, अ‍ॅड. मृगाली नाईक, प्रा. गिरीधर परांजपे, काका मांजरेकर, विकास गोवेकर, कल्पना बांदेकर, किरण सिद्धये, अंकुश कदम, महेश परुळेकर, नीला आपटे, राजश्री टिपणीस आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी अभिनवचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, ग्रंथपाल गितांजली ठाकूर, किशोर चिटणीस आदींनी विशेष परिश्रम घेतले. (वार्ताहर)डॉ. प्रसाद देवधर यांनी, ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी अभिनव गं्रथालयासारखे उपक्रम राबविले पाहिजेत. स्वयंसेवी संस्थांनी केलेली मदत एखाद्या क्षेत्रापुरती रहाते. मात्र, स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी घडल्यास ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठे बदल घडवू शकतात, असे सांगितले.