आरोग्य सुविधाप्रश्नी न्यायालयीन लढा देणार
By Admin | Updated: August 24, 2014 22:34 IST2014-08-24T21:40:43+5:302014-08-24T22:34:57+5:30
विरेंद्र नेवे : सावंतवाडीतील कार्यक्रमात प्रतिपादन

आरोग्य सुविधाप्रश्नी न्यायालयीन लढा देणार
सावंतवाडी : उच्च न्यायालयातील न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून कोकणातील जनतेचा सार्वजनिक आरोग्य सुविधांचा प्रश्न सोडवू, असे प्रतिपादन अॅड. विरेंद्र नेवे यांनी अभिनव गौरव पुरस्कार स्वीकारताना केले.
सिंधुुदुर्गातील ट्रामा केअर युनिट व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीच्या प्रश्नावर अभिनव फाऊंडेशनमार्फत मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक जाणीवेतून जनहित याचिका दाखल करत न्यायालयीन लढा दिल्याबद्दल अॅड. नेवे व त्यांच्या पत्नी अॅड. अमृता पाटील यांचा नुकताच अभिनव गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
सावंतवाडीतील भाजी विक्रेते सुभाष माणगावकर यांच्या हस्ते मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन अॅड. नेवे व अॅड. पाटील यांना गौरविण्यात आले. अभिनव गं्रथालयाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त आयोजित या सत्कार समारंभास भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे चेअरमन श्रीपाद चोडणकर, पतसंस्थेचे व्यवस्थापक ज्ञानदेव नावलकर, प्रा. विजय फातर्पेकर, अभिमन्यू लोंढे, अभिनव फाऊंडेशनचे डॉ. प्रसाद नार्वेकर, सहसचिव अॅड. शशांक मराठे आदी उपस्थित होते.
यावेळी अभिनव फाऊंडेशनच्या बँकींग मार्गदर्शन वर्गातून बँकींग परीक्षा उत्तीर्ण झालेल्या अनघा कुमठेकर यांचा प्रा. फातर्पेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. चिकाटीने अभ्यास केल्यास यशस्वी होता येईल, असे कुमठेकर म्हणाल्या.
परिचय आेंकार तुळसुलकर, प्रास्ताविक डॉ. प्रसाद नार्वेकर, स्वागत जितेंद मोरजकर, सूत्रसंचालन अॅड. मराठे, आभार संस्था सचिव अण्णा म्हापसेकर यांनी मानले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, पेंशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनंत ओटवणेकर, सचिव एम. एम. राजगुरू, अॅड. गौतम गव्हाणकर, अॅड. मृगाली नाईक, प्रा. गिरीधर परांजपे, काका मांजरेकर, विकास गोवेकर, कल्पना बांदेकर, किरण सिद्धये, अंकुश कदम, महेश परुळेकर, नीला आपटे, राजश्री टिपणीस आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी अभिनवचे खजिनदार जितेंद्र मोरजकर, ग्रंथपाल गितांजली ठाकूर, किशोर चिटणीस आदींनी विशेष परिश्रम
घेतले. (वार्ताहर)
डॉ. प्रसाद देवधर यांनी, ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी अभिनव गं्रथालयासारखे उपक्रम राबविले पाहिजेत. स्वयंसेवी संस्थांनी केलेली मदत एखाद्या क्षेत्रापुरती रहाते. मात्र, स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी घडल्यास ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर मोठे बदल घडवू शकतात, असे सांगितले.