शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

दुर्दम्य आशावादावर त्यांनी दिली ५००० व्याख्याने

By admin | Updated: March 31, 2015 00:23 IST

चंद्रकांत देवलाटकर : अंधाने बदलले साहित्यातून स्वत:चे, वाचकांचे विश्व, जगण्याचे गाणे

अमोल पवार- आबलोली  -अंध असूनही शालेय क्रमिक पुस्तकांवर डोळसपणे व्याख्याने देणारे आणि आपल्या प्राप्त अनुभवांना साहित्यरुपाने वाचकांसमोर ठेवणारे अलौकिक व्यक्तिमत्व म्हणजे चंद्रकांत सीताराम देवलाटकर. धामापूरतर्फ संगमेश्वर येथील या अवलियाने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आजपर्यंत सुमारे ५००० व्याख्यानांचे कार्यक्रम तसेच चार वार्षिकांक प्रसिद्ध केले आहेत.शालेय पाठ्यपुस्तकांमधील भाषा विषय, त्यातील व्याकरण आणि लेखन हे त्यांच्या व्याख्यानाचे विषय. आपले शिक्षण बारावीपर्यंत झाले. मात्र, त्याचवर्षी सर्पदंशाने आपली दृष्टी गेली आणि तेव्हापासून आजतागायत आपण दुसऱ्यांकडून वाचून लिहून घेत आहोत. अनेक नवीन कवितांना चाली लावणे, पद्यातील अलंकारिकता, गद्याचे वेगळेपण, लेखनकौशल्य, भाषणकौशल्य इत्यादी विषयावर देवलाटकर हिरीरीने बोलतात. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक शाळांमधून त्यांचे कार्यक्रम सादर झाले आहेत. कार्यक्रमस्थळी जाण्यासाठी त्यांना कुणाचा तरी आधार घ्यावा लागतो. केवळ व्याख्यानांवर न थांबता देवलाटकर यांनी चित्रांगी, रत्नपारखी, स्वयंसिद्ध, मानी मराठा हे चार विशेषांक सिद्धी प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित केले आहेत. आपल्या साहित्य लेखनासाठी मुलगी चारुलता, मुलगा चिंतामणी मदत करत असल्याचे देवलाटकर यांनी सांगितले.आपण एकपाठी असून, एखाद्याकडून वाचून घेतलेले साहित्य आपल्या चांगले लक्षात राहाते असे ते म्हणतात. पत्नीच्या निधनानंतर आपण खचलो. मात्र, तिच्याच आठवणीने आपण लेखन करुन घेतो. ॐ निसिनंदन चंद्रकांत, स्वरचंद्रन, चित्रकांत, चिद्रातंदीचंद्र आदी नावानी त्यांनी संगीतकार, नाटककार, विडंबनकार म्हणून लेखन केले आहे. आपल्या जीवनाविषयी देवलाटकर म्हणतात, आपले जीवन म्हणजे अक्रोडाचे झाड आहे. ज्याप्रमाणे अक्रोडाला १०० वर्षांनंतर फळे येतात म्हणून झाड लावायचं सोडायचं का? हाच प्रतिप्रश्न समोरच्या व्यक्तीला अंतर्मुख करायला लावतो. देवलाटकरांचे हे व्याख्यान, लेखन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. आजच्या पिढीसाठी देवलाटकर यांचं प्रसन्न जगणं आणि त्यातून नवनिर्मितीचा छंद निश्चितच अपेक्षा वाढविणारा आहे.अंध असूनही देत आहेत क्रमिक पुस्तकांवर व्याख्याने.चार वार्षिकांक, भाषा, व्याकरण, पाठ्यपुस्तके यांच्यावर केले प्रेम. केवळ एखाद्या ठिकाणावर जाण्यासाठी घ्यावा लागतो एखाद्याचा आधार.