शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

मास्क लावायला विसरला, कॉलरला धरुन पोलिसांनी फरफटत ओढून केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 16:10 IST

CoronaVirus Crimenews sindhudurg police: वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी कारण नसताना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची धमकी देऊन आपल्या कॉलरला धरुन फरफटत ओढून मारहाण केली. तसेच गळ्याला नखे लावून दुखापत केली असा आरोप करत वेंगुर्ला येथील व्यावसायिक आदित्य हळदणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.

ठळक मुद्देमास्क लावायला विसरला, कॉलरला धरुन पोलिसांनी फरफटत ओढून केली मारहाण वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या विरोधात पोलिस अधीक्षक यांच्याकडे तक्रार

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी कारण नसताना मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविल्याची धमकी देऊन आपल्या कॉलरला धरुन फरफटत ओढून मारहाण केली. तसेच गळ्याला नखे लावून दुखापत केली असा आरोप करत वेंगुर्ला येथील व्यावसायिक आदित्य हळदणकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे.आदित्य सुभाष हळदणकर याने दिलेल्या तक्रार वजा निवेदनात म्हटले आहे की, दिनांक २४ मे २०२१ रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास मी व माझा मित्र त्याच्या रामेश्वर मंदीर शेजारील घरा समोर उभ्या असलेल्या त्यांच्या चार चाकी गाडीमध्ये बसलो असताना एक पोलिस हे गाडी जवळ आले व गाडीची काच खाली करण्यास सांगितली व पोलीस निरीक्षक यांनी तुम्हाला तत्काळ बोलावले आहे असे सांगितले.

मी लगेचच गडबडित मास्क विसरून गाडीकडे गेलो असता तानाजी मोरे यांनी मला तुझे मास्क कोठे आहे? असे विचारले, त्यावर मी त्यांना असे सांगितले की, साहेब मास्क गाडीमध्ये आहे, ताबडतोब ये असे सांगितल्याने मी आलो, त्यामुळे मास्क लावायला विसरलो, थांबा मी लगेच मास्क लावून येतो. त्यावर मोरे यांनी मला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत गाडीतून खाली उतरले व माझ्या शर्टच्या कॉलरला पकडून मला फरफटत गाडीमध्ये बसविण्याचा प्रयत्न करु लागले. त्यावेळी माझ्या गळ्याला त्यांची नखेही लागली. तरी देखील ते मला सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवू शकतो, मी पोलिस निरीक्षक आहे. कोणी माझे काहीही करू शकत नाही असे सांगितले. दरम्यान या प्रकारामुळे मी भयभीत झालेलो असून पोलिस निरीक्षक तानाजी मोरे हे आपल्या पदाचा गैरवापर करून माझ्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल करून माझ्या जिवाचे काहीतरी करण्याच्या इराद्यात आहेत. त्यांच्या पासून माझ्या जिवाला धोका आहे.त्यामुळे माझे काही बरेवाईट झाल्यास त्यास देखील तानाजी मोरे हे सर्वस्वी जबाबदार राहतील. मी प्रचंड मानसीक तणावाखाली आहे. तानाजी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करुन यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व मला न्याय मिळावा अशा प्रकारे मागणी आदित्य हळदणकर याने पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग