शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

हरकुळ बुद्रुक येथे किरकोळ वादातुन तरुणाचा खुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 16:16 IST

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अफजल सुलतान शेख ( २७, रा. शेखवाडी) याचा धारदार फरशीने चार वार करत खुन करण्यात आला आहे.ही घटना सोमवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. संशयीत आरोपी मुजफ्फर आदमशा पटेल (३२, कुंभारवाडी) याने किरकोळ वादातुन झालेल्या शिवीगाळीनंतर अफजल शेखचा खुन केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देहरकुळ बुद्रुक येथे किरकोळ वादातुन तरुणाचा खुनधारदार फरशीने चार वार ; आरोपीला पोलीसांनी केले अटक

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अफजल सुलतान शेख ( २७, रा. शेखवाडी) याचा धारदार फरशीने चार वार करत खुन करण्यात आला आहे.ही घटना सोमवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. संशयीत आरोपी मुजफ्फर आदमशा पटेल (३२, कुंभारवाडी) याने किरकोळ वादातुन झालेल्या शिवीगाळीनंतर अफजल शेखचा खुन केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटने नंतर पसार झालेल्या संशयीताला कणकवली पोलीसांनी मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता राहत्या घरातुन अटक केली.

संशयित आरोपी मुजफ्फर पटेल

मृत अफजल शेखयाबाबत घटनास्थळ तसेच पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयीत आरोपी मुजफ्फर पटेल आणि अफजल शेख हे जीवलग मित्र होते. ते खाण्या पिण्याच्या निमित्ताने अनेकवेळा एकत्र असायचे. काही दिवसापुर्वी संशयीत आरोपीने अफजल शेख याला तुझ्या भाऊजीचा मृत्यु होणार, असे म्हटले होते. गेल्या दोन महिन्यापुर्वी अफजल शेखच्या भाऊजींचे निधन झाले होते. त्या कारणावरुन दोन्ही मित्रांमध्ये काही दिवसांपासुन वाद सुरु होते.पुन्हा सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हरकुळ बुद्रुक येथील भाट दुकान परिसरात या दोघांमध्ये वाद झाला. त्यानी एकमेकास शिवीगाळ केली. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले होते. काही वेळाने अफजल शेख हा मासे मारण्यासाठी खास बनविलेली शिग घेवुन आपल्या मोटरसायकलवरुन संशयीत आरोपी मुजफ्फर पटेल याच्या घराकडे गेला. घराबाहेर राहुन आई तसेच संपुर्ण पटेल कुुटुंबियाला त्याने शिवीगाळ केली. यावेळी वाद होतील आणि हाणामारी होईल या भितीतुन संशयीताच्या भावाने आरोपीला घरातच बंद करुन ठेवले होते. हा शिवीगाळीचा प्रकार रात्री १० वाजण्याच्या सुमारास सुरु होता.त्यानंतर अफजल शेख हा तेथीलच दुसरा मित्र रिझवान पटेल याच्या घरासमोर जावुन पुन्हा शिवीगाळी करायला लागला . रिझवान पटेल याने अफजलला ' तू घरी जा, उद्या तुझ्या भावाला घेवुन हा विषय मिटवूयात' , असे सांगितले. त्यानंतर अफजल शेख मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी जात होता. तेवढयात संशयीत आरोपी मुजफ्फर पटेल हा आपल्या घरातुन सुतार कामासाठी वापरण्यात येत असलेली फरशी हातात घेवुन बाहेर आला.

त्यांनतर दोघांची बाचाबाची जोरदार सुरु झाली. शिवीगाळ आणि शाब्दीक बाचाबाची झाल्यानंतर काही क्षणातच दोघांचाही आवाज बंद झाला. अचानक काय झाले ? म्हणुन रिझवान पटेल याने घराबाहेर येवुन मोबाईलच्या बॅटरीवर पाहले असता धापा टाकत गंभीर जखमी अवस्थेत अफजल शेख जमिनीवर कोसळलेला त्याला दिसला.रिझवान पटेल याने ताबडतोब अफजल शेखच्या भावाला झालेली घटना कळविली.त्याचा भाऊ घटनास्थळी येताच जखमी अफजलला मारुती व्हॅनमधुन कणकवली येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. अफजल गंभीर असल्याने डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी पुढे नेण्याची सुचना केली. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत अफजल शेखचा मृत्यु झाला होता.फरशीच्या सहाय्याने अफजल शेखच्या छातीत, पोटात, डाव्या कुशीत, डाव्या बाजूला पाठीत अशा चार ठिकाणी खोलवर वार संशयीत आरोपी मुजफ्फर पटेल याने केले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. तो गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. तसेच घराशेजारील जंगलमय भागात सोमवारची रात्र काढली. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

आरोपीच्या शोधासाठी कणकवली बसस्थानक, रेल्वेस्टेशन, महामार्ग, हरकुळ बुद्रुक संपुर्ण गाव व खुन झालेल्या जंगलात शोध मोहीम राबविण्यात आली. पहाटेपर्यंत पोलीसांच्या विविध पथकानी नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविली. मात्र आरोपी हाती लागला नव्हता.

पोलीसांनी आरोपीचे लोकेशन मोबाईल फोनद्वारे काढले असता, गावातीलच टॉवरच्या परिसरात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलीसांनी सकाळपासुनच गावात ठाण मांडले होते. त्याचबरोबर घरातील नातेवाईकांना विश्वासात घेतले होते. अखेर मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता संशयित आरोपी मुजफ्फर पटेल घरी आला असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेनण्यात आले.खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. रात्री प्राथमिक तपास करत हा खुन कोणत्या कारणातुन झाला? याची माहीती त्यांनी काढली. आरोपी व मृत या दोघांनीही सायंकाळी मद्यप्राशन केल्याची चर्चा गावात होती. दोघांमध्ये सायंकाळपासुन वाद सुुरु होते. या वादाबाबतची कल्पना अफझल याने आरोपीचे शेजारी रिझवान पटेल याना फोनवरुन दिली होती. अफजल शेख याने आरोपीच्या घरी जाण्यापुर्वी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फोनवरुन ' मी मुजफ्फर पटेल याला मारणार आहे. तु मध्ये पडु नकोस', असेही रिजवान याला सांगितले होते. त्यानंतर तो आरोपीच्या घरी गेला, शिवीगाळ केली .

रिजवान पटेल याने त्याची समजुत काढली. तो परत जात असताना आरोपी व अफजल शेख याच्यात वाद झाला. रिझवान पटेल याच्या घरासमोर काही अंतरावर काळोखात कुंभारवाडी ते नाईकवाडी जाणाऱ्या रस्त्यावर दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन खुनात झाले. घटनास्थळी अफजल याची मोटरसायकल, आरोपीला मारण्यासाठी आणलेली लोखंडी शिग, चप्पल पडलेली होती. या घटनास्थळाचा पंचनामा कणकवली पोलीसांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास केला.खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस निरिक्षक शिवाजी कोळी, सहाययक पोलीस निरीक्षक जँबाजी भोसले, पोलीस उपनिरिक्षक राजवर्धन खेबुडे, प्रकाश कदम, बापु खरात, उत्तम पवार, पोलीस हवालदार भुषण सुतार, चालक राजु उबाळे, झुजे फर्नांडिस आदींसह पोलीसांचे पथक ठाण मांडुन होते. शोधमोहीमेसाठी पोलीस पाटील संतोष तांबे, माजी पंचायत समिती उपसभापती बुलंद पटेल, राजु पेडणेकर, आनंद ठाकुर यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी मदत केली.रात्री १२ वाजल्यापासुन पहाटेपर्यंत शोधमोहीम संपुर्ण जंगलमय भागात राबविण्यात आली. या खुन प्रकरणातील आरोपी मुजफ्फर पटेल हा कणकवली-वागदे येथील महिंद्रा शोरुममध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. तर मयत अफजल शेख हा जानवली येथे टिव्हीएस शोरुममध्ये मॅकॅनिकचे काम करत होता.अफजल शेख याच्या पश्चात्त आई, भाऊ, पत्नी, दोन वर्षाची एक मुलगी व दोन महिन्याची एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेनंतर शोकाकुल वातावरणात अफजल शेखवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत अफजल याचा भाऊ सरफाज सुलतान शेख याने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवीली आहे.१२ तासात आरोपी गजाआड!खुनाची घटना घडल्यानंतर अफजल शेख याच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भुमिका घेतली. अफजल शेख याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शवागृहात ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलीसांनी पुन्हा शोधमोहीम सकाळपासुनच सुरु केली होती. अखेर आरोपी घरात आला आणि पोलीसांच्या हाती लागला. या घडलेल्या घटनेनंतर अवघ्या १२-१३ तासातच आरोपी मुजफ्फर पटेल याला बेडया ठोकण्यात पोलीसांना यश आले. 

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग