शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हळदिकुंकू वाणावरून नारिशक्ती एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:12 IST

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वत्र राबविण्यात येत असलेल्या उत्कर्षा अंतर्गत महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून नांदगाव ग्रामपंचायतीच्यावतीने हळदीकुंकू समारंभाला वाण म्हणून सॅनिटरी पॅड सरसकट किशोरवयीन मुलींपासून ते वयोवृध्द महिलांनाही वाटप करण्यात आले. त्यामुळे नांदगाव मधील महिला संतप्त झाल्या असून त्यांनी नांदगाव ग्रामपंचायतीवर धडक मारली. यावेळी सरपंच यांना जाब विचारत याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.

ठळक मुद्देहळदिकुंकू वाणावरून नारिशक्ती एकवटल्यामहिलांनी दिले निवेदन : नांदगाव सरपंचांना विचारला जाब

सिंधुदुर्ग : जिल्हा प्रशासनाच्यावतीने सर्वत्र राबविण्यात येत असलेल्या उत्कर्षा अंतर्गत महिलांसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमावरून नांदगाव ग्रामपंचायतीच्यावतीने हळदीकुंकू समारंभाला वाण म्हणून सॅनिटरी पॅड सरसकट किशोरवयीन मुलींपासून ते वयोवृध्द महिलांनाही वाटप करण्यात आले. त्यामुळे नांदगाव मधील महिला संतप्त झाल्या असून त्यांनी नांदगाव ग्रामपंचायतीवर धडक मारली. यावेळी सरपंच यांना जाब विचारत याबाबत निवेदनही देण्यात आले आहे.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग अंतर्गत उत्कर्षा योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फक्त किशोरवयीन मुली व महिलांसाठी मासिक पाळी व आरोग्यमान सुधारणेबाबत मार्गदर्शन आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावेळी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करून त्यांना वान म्हणून सॅनिटरी पॅड वाटप करण्यात यावेत असे सूचित करण्यात आले. विशेष म्हणजे नांदगाव ग्रामपंचायतीने याबाबत कहर करत सरसकट किशोरवयीन मुलींपासून वयोवृद्ध महिलांनाही सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आल्याने महिला संतप्त झाल्या.वरिष्ठ कार्यालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार ग्रामपंचायत स्तरावर आयोजित हळदिकुंकु कार्यक्रमात सॅनिटरी पॅडच्या पॅकेटचे वाटप करण्यात यावे असे नमूद केल्याने हळदिकुंकू कार्यक्रमावेळी नांदगाव ग्रामपंचायतच्या मासिक बैठकित ठरल्याप्रमाणे वाण म्हणून या सॅनिटरी पॅड शिवाय प्रत्येकाला १ श्रीफळ वाटप करण्याचे ठरले. त्याप्रमाणे ४०० श्रीफळ खरेदी करण्यात आले होते. हे श्रीफळ त्या कार्यक्रमात वाटप करण्यात येणार होते. मात्र, नांदगाव पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके यांनी हळदीकुंकू साठी आलेल्या सरसकट सर्व महिलांना फक्त सॅनिटरी पॅडचेच वाटप करा व श्रीफळ वाटू नका असे सांगीतल्याचे ग्रामपंचायत येथे या कृतीचा निषेध करण्यासाठी जमलेल्या महिलांकडून समजले.याबाबत नांदगांव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी तुमच्या भावना मी समजू शकते यात तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता असे आलेल्या सर्व महिलांना सांगत शासनस्तरावरून आलेल्या परिपत्रकाबाबत माहिती देवून त्याच्या प्रति दिल्या आणि या संदर्भात पंचायत समिती सदस्या वाळके यांचे म्हणने आपण शनिवारी (२ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता या विषयांवर चर्चा करून निर्णय घेवू, असे सांगितले.

शनिवारी याबाबत चर्चानांदगाव ग्रामपंचायतीमध्ये सर्व महिलांना हळदीकुंकू समारंभाला सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढला. यावेळी निवेदन देत महिलांचा झालेल्या अपमानाबद्दल निषेध व्यक्त केला. हा सर्व प्रकार पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके यांच्या समक्ष झाल्याने त्या आल्यानंतर याबाबत खास सभा लावून चर्चा करण्यात येणार असल्याचे सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी सांगितले.

टॅग्स :Womenमहिलाsindhudurgसिंधुदुर्ग