हत्तींकडून भाताची उडवी फस्त
By Admin | Updated: December 23, 2014 00:36 IST2014-12-23T00:36:41+5:302014-12-23T00:36:41+5:30
शेतकरी चिंताग्रस्त

हत्तींकडून भाताची उडवी फस्त
माणगाव : माणगाव परिसरात हत्तींकडून शेतकऱ्यांच्या भाताच्या उडव्या फस्त करण्याचे सुरुच असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रविवारी रात्री माणगाव- आंबेडकरनगर येथील शाम भाऊ कदम यांच्या भाताच्या दोन उडव्या हत्तींनी फस्त केल्या.
माणगाव- मळावाडी परिसरात हत्तींनी रविवारी आंबेडकरनगर येथे मोर्चा वळवत भाताच्या उडव्या फस्त केल्या आहेत. दिवसभर जंगलमय परिसरात भटकंती करणारे हत्ती सायंकाळ होताच मानवी वस्तीच्या दिशेने कुच करत आहेत. नानेलीतील नुकसानीनंतर हत्तींनी माणगाव परिसरात धुडगुस घालण्यास सुरुवात केली आहे.
येथील बऱ्याच शेतकऱ्यांचे माड उन्मळून टाकत हत्तींनी नुकसानी सुरु ठेवली आहे. माणगाव परिसरातील शेतकऱ्यांनी वर्षभरासाठी जमा केलेली भाताची पुंजी हत्तींनी फस्त केली असून लवकरच हत्ती हटाव मोहिम न राबविल्यास येथील शेतकऱ्यांमधील संतापाचा उद्रेक होण्याचा संभव
आहे. (प्रतिनिधी)