शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:34 IST

जमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारी झाली. यात दोन विवाहित महिला जखमी झाल्या असून, परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कोलगावकर विरूद्ध कारिवडेकर या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली.

ठळक मुद्देजमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारीपरस्परविरोधी गुन्हा दाखल

सावंतवाडी : जमीन-जागेच्या वादातून कारिवडेत दोन गटात हाणामारी झाली. यात दोन विवाहित महिला जखमी झाल्या असून, परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. कोलगावकर विरूद्ध कारिवडेकर या दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. यात अश्विनी अनिल कोलगावकर व प्रणिता कोलगावकर या दोघीही जखमी झाल्या आहेत. प्रणिताच्या हाताला दुखापत झाली असून, अश्विनीचे मंगळसूत्र आणि मोबाईल चोरीस गेला आहे.जमीन-जागेच्या वादातून कारिवडे-गावठाणवाडी येथे दोन गटात दांड्याने जोरदार हाणामारी झाली. यात दोन महिला जखमी झाल्या आहेत. हा प्रकार रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला. कोरगावकर कुटुंबीय आपल्या घराशेजारील माती आपल्याच कंपनीच्या बाजूला जेसीबीने टाकत असताना कारिवडेकर कुटुंबीयांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता ही हाणामारी झाली.कारिवडे-गावठाणवाडी येथे लता बाबी कोलगावकर हिच्या मालकीची जमीन असून, या जमिनीशेजारी महादेव कृष्णा कारिवडेकर यांची जमीन आहे. आपल्या जमिनीच्या बाजूने खड्डा खोदून त्या ठिकाणी दोघी कोलगावकर महिला माती टाकत असताना पाहून महेश महादेव कारिवडेकर, रवी कारिवडेकर, आनंद बाबाजी कारिवडेकर, मिलन महेश कारिवडेकर, समिती महादेव कारिवडेकर यांनी प्रणिता कोलगावकर, अनिल कोलगावकर व अश्विनी कोलगावकर यांच्यावर दांड्याने हल्ला केला. यात प्रणिता व अश्विनी यांना दुखापत झाली आहे.या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, संबंधित जखमी महिलांनी आपल्याला चार ते पाच पुरुषांनी जमाव करून मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या जखमींमध्ये आई व विवाहित मुलगी यांचा समावेश आहे. दरम्यान, कारिवडेकर कुटुंबीयांनी आपल्या घरात आपणास येऊन मारहाण केल्याची परस्परविरोधी तक्रार दिली आहे. तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग