शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला जनतेचा विरोध, सेना स्थानिकांच्या पाठीशी : अरुण दुधवडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 5:08 PM

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असून शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. या प्रकल्पाला शिवसेनेचा कायमच विरोध राहील, असे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देवगड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, शहरप्रमुख संतोष तारी, लक्ष्मण तारी उपस्थित होते.

ठळक मुद्देग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा कायम विरोध शिवसेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणारअरुण दुधवडकर यांनी घेतला देवगड, कणकवली तालुक्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा

देवगड : ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असून शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील. या प्रकल्पाला शिवसेनेचा कायमच विरोध राहील, असे शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. देवगड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उपतालुकाप्रमुख सुनील जाधव, जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, शहरप्रमुख संतोष तारी, लक्ष्मण तारी उपस्थित होते.

ग्रीन रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा कायम विरोध राहील. स्थानिक लोकांचा या प्रकल्पाला विरोध असून शिवसेना स्थानिक जनतेच्या पाठीशी राहील. मच्छिमारी व्यवसायावर या प्रकल्पाचा नक्कीच परिणाम होणार आहे, असे अरुण दुधवडकर यांनी सांगितले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड व कणकवली तालुक्यांतील निवडणुकीचा आढावा त्यांनी घेतला.

शिवसेना सर्व ताकदीनिशी तालुक्यातील सातही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उतरली असून सेनेला चांगले वातावरण आहे. एक-दोन ठिकाणी गाव पॅनेलबरोबर तर उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये स्वबळावर निवडणूक लढवित आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत देवगड तालुक्यातील दौऱ्यात देवगड-आनंदवाडी प्रकल्पाविषयीची वस्तुस्थिती ही मच्छिमारांचे संस्था प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यात येणार असल्याचे सांगितले.

कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरणार असल्याचेही ते म्हणाले. शिवशाही एस. टी. सेवेबरोबरच साधी परिवहन सेवा लांब पल्ल्याकरीता सुरू रहावी. त्यात ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळावी, अशी मागणी परिवहन मंत्र्यांकडे करणार असल्याचेही दुधवडकर यांनी सांगितले.शिवसेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणारआगामी विधानसभा निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असून धनुष्यबाण हाच आमचा उमेदवार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ग्रामपंचायत निवडणुका झाल्यानंतर पंचायत समितीनिहाय तालुक्यातील प्रत्येक शाखाप्रमुख व महिला शाखाप्रमुखांची बैठक घेणार असून त्यांच्या समस्या जाणून घेणार व त्यानंतर संघटना बांधणीवर भर देणार आहे.

गावागावात शिवसेनेचे असलेले नेटवर्क आणखीन मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. फयान वादळाच्या निकषाप्रमाणेच ओखी वादळात नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दुधवडकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाsindhudurgसिंधुदुर्ग