शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: शिवापूर-शिरशिंगे मार्गाला वनविभागाचा हिरवा कंदील, सह्याद्रीमधील महत्त्वपूर्ण महामार्ग

By अनंत खं.जाधव | Updated: May 14, 2024 17:02 IST

सावंतवाडी व कुडाळ या दोन तालुक्यांना हा महामार्ग जोडला जाणार

सावंतवाडी : सह्याद्री पट्ट्यातील महत्त्वपूर्ण अशा मानल्या जाणाऱ्या शिरशिंगे शिवापूर मार्गाला भेडसावणाऱ्या वनजमिनीचा प्रश्न निकाली निघाला असून या मार्गाला अखेर केंद्र सरकार च्या वन व पर्यावरण मंत्रालयाने परवानगी दिली आहे. तसे पत्र ही सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाले असून. हा महामार्ग सावंतवाडी व कुडाळ या दोन तालुक्याना जोडला जाणार आहे.सहयाद्री पट्ट्यातील मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या शिरशिंगे गावातून कुडाळ तालुक्यातील शिवापूर या गावाला जोडल्या जाणाऱ्या शिवापूर शिरशिंगे रस्त्याला वनविभागाचा अडथळा होता.या अडथळ्यांवर मात करण्यासाठी गेले कित्येक वर्ष बांधकाम विभाग प्रयत्नशील होते.बांधकाम कडून वनविभागाकडे पत्र व्यवहार सुरू होते.त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र सरकार कडे पाठविण्यात आला होता.शिरशिंगे शिवापूर मार्गावर 3.7 किमी चा वनजमीनीचा प्रश्न होता.या जमिनी बाबत विविध स्तरावर पत्र व्यवहार झाल्यानंतर केंद्र सरकार च्या वन व पर्यावरण मंत्रालया कडून या जमिनीचा प्रश्न निकाली काढण्यात आला असून या रस्त्यासाठी विशेष मंजुरी देण्यात आली आहे. तसेच या जमिनीच्या मोबदल्यात पर्यायी जमिन देण्यात यावी अशी अट घालण्यात आली आहे.तब्बल सत्तावीस अटीची पूर्तता करण्यात यावी असे निर्देश परवानगी देताना घालण्यात आले आहेत. त्यामुळे आता सावंतवाडी व कुडळ या दोन तालुक्यांना जोडणारा शिरशिंगे शिवापूर हा मार्ग होण्यास वनविभागाकडून हिरवा कंदील मिळाला असून आचारसंहितेनंतर पर्यायी जमिनीचे पैसे सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभाग भरणार आहे. आणि त्यानंतरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.सावंतवाडी व कुडळ या सह्याद्रीमधील महामार्गाला परवानगी देण्यात आल्याने दोन तालुक्यातील संपर्क  सुलभ होणार आहे तसेच दळणवळणाच्या दृष्टीने ही हा महामार्ग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे महेंद्र केणी यांना विचारले असता या शिरशिंगे शिवापूर मार्गाला वनविभागाकडून परवानगी मिळाली मिळाल्याचे मान्य केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्गforest departmentवनविभाग