इंग्रजी शाळांनाही अनुदान द्याव

By Admin | Updated: January 2, 2015 00:22 IST2015-01-01T21:26:01+5:302015-01-02T00:22:32+5:30

वैभव नाईक : शिक्षणमंत्र्यांकडे मागणी करण्याचे आश्वासने

Grant to the English schools too | इंग्रजी शाळांनाही अनुदान द्याव

इंग्रजी शाळांनाही अनुदान द्याव

कणकवली : सध्याच्या युगात इंग्रजी शिक्षणालाही महत्त्व आहे. त्यामुळे आता मराठी शाळांप्रमाणे इंग्रजी माध्यमांच्या शाळांनाही शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी आपण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी नक्कीच प्रयत्न करेन, असे सांगतानाच आयडियल स्कूलच्या मदतीसाठी नेहमी पुढे असेन, असे आश्वासन आमदार वैभव नाईक यांनी  दिले.वरवडे येथील ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश माध्यम स्कूलच्या दशकपूर्ती आयडियल शिशुवर्गाच्या उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी नाईक बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष विजय वळंजू, रोटरीचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, पंचायत समिती सदस्या भाग्यलक्ष्मी साटम, चेअरमन डॉ. विद्याधर तायशेटे, बुलंद पटेल, प्रा. हरिभाऊ भिसे, निलेश महेंद्रकर, मोहन सावंत, डी. पी. तानवडे, शीतल सावंत, भूषण परुळेकर, प्राचार्या गीतांजली कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी विजय वळंजू यांनी सांगितले की, आॅस्ट्रेलियासारख्या देशात भारतीय शिक्षणाला प्राधान्य देतात. आज पालकांनीही अभ्यास करण्याची गरज आहे. केवळ पदवीसाठी मुलांना शिक्षण न देता पालकांनी जगातील घडामोडींचा अभ्यास करून पाल्यांना दिशा देण्यासाठी प्रयत्न करावेत. दीपक बेलवलकर म्हणाले, याठिकाणी येऊन आज लहानपणीची आठवण येत आहे. आम्हीदेखील कधीतरी गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला त्या आठवणी ताज्या झाल्या.
कार्यक्रमानंतर आयडियल स्कूलच्या कणकवली व वरवडे येथील नर्सरी ते दुसरीपर्यंतच्या मुलांचा कार्यक्रम व बक्षीस समारंभ झाला. सूत्रसंचालन राजेश कदम यांनी केले. नीलेश महेंद्रकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


दहा लाखांचा निधी मंजूर
या प्रशालेच्या इमारतीच्या उद्घाटनाला मी उपस्थित होतो. त्यावेळी ३० ते ४० विद्यार्थी असलेल्या या शाळेत आज ५०० हून अधिक विद्यार्थी आहेत. छोटे रोपटे आज मोठे झाले आहे. आयडियल स्कूलच्या सुरेश कोदे सायन्स प्रयोगशाळेसाठी खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून १० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापुढेही असे प्रयत्न करण्यात येतील.

Web Title: Grant to the English schools too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.